Alisha Khedekar
बटाट्याच्या सालींमध्ये पोटॅशियमसह काही पोषक घटक असतात. योग्य वापर केल्यास त्या कंपोस्ट खतासाठी उपयुक्त ठरू शकतात.
बटाट्याच्या सालींवरील माती आणि घाण स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या. शक्यतो मीठ किंवा तेल लागलेल्या साली टाळा.
सालींचे बारीक तुकडे केल्याने कंपोस्टमध्ये त्यांचे विघटन तुलनेने लवकर होण्यास मदत होते.
बटाट्याच्या साली कोरड्या पानांसोबत कंपोस्टमध्ये मिसळा. पूर्ण कुजल्यानंतर हे खत झाडांसाठी वापरता येते.
कच्च्या साली थेट कुंडीत टाकल्यास दुर्गंधी, बुरशी आणि किडींचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे कंपोस्ट करणे उत्तम.
गुलाब, जास्वंद आणि इतर शोभेच्या झाडांना संतुलित पोषणाची गरज असते. कुजलेले कंपोस्ट त्यांच्या मातीसाठी उपयुक्त ठरू शकते.
सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा