Women Health : महिलांमध्ये झपाट्याने वाढतोय हाडे पोकळ करणारा 'हा' गुप्त आजार, कोणतीही लक्षणे न दिसताच वाढतो धोका

Alisha Khedekar

लक्षणे दिसत नाहीत

ऑस्टिओपोरोसिस हा हाडे कमकुवत आणि ठिसूळ करणारा आजार आहे. या आजाराची सुरुवातीला स्पष्ट लक्षणे दिसत नाहीत. हाड फ्रॅक्चर झाल्यानंतर अनेकदा महिलांना आजाराची जाणीव होते.

women osteoporosis warning signs | Google

वयानुसार वाढतो धोका

वाढत्या वयाबरोबर हाडांची घनता कमी होऊ शकते. त्यामुळे ज्येष्ठ महिलांनी हाडांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.

women osteoporosis warning signs | Google

रजोनिवृत्तीचा परिणाम

रजोनिवृत्तीनंतर इस्ट्रोजेन हार्मोनची पातळी कमी होते. त्यामुळे हाडांची झीज वेगाने होऊन ऑस्टिओपोरोसिसचा धोका वाढू शकतो.

women osteoporosis warning signs | Google

कॅल्शियमची कमतरता

आहारातून पुरेसे कॅल्शियम न मिळाल्यास हाडांच्या मजबुतीवर परिणाम होऊ शकतो. दूध, दही आणि नाचणीचा आहारात समावेश करा.

women osteoporosis warning signs | Google

व्हिटॅमिन डी महत्त्वाचे

व्हिटॅमिन डी शरीराला कॅल्शियम शोषण्यास मदत करते. त्याच्या कमतरतेमुळे हाडांचे आरोग्य बिघडू शकते. डॉक्टरांच्या सल्ल्याने तपासणी करा.

women osteoporosis warning signs | Google

पाठदुखीकडे दुर्लक्ष नको

सतत पाठदुखी, उंची कमी होणे किंवा पाठ वाकणे ही मणक्यांच्या हाडांशी संबंधित समस्यांची चिन्हे असू शकतात.

women osteoporosis warning signs | Google

टीप

सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा

women osteoporosis warning signs | Google

NEXT :  चहा कपात ओतताना सांडतो? या ट्रिक्स करा फॉलो; थेंबही जाणार नाही वाया

Tips for pouring tea | AI Image
येथे क्लिक करा