Anna Hazare : मी कधीही पक्षाच्या जवळ गेलो नाही, सोनिया गांधींच्या पुस्तकातील दाव्यावर अण्णा हजारे संतापले

Anna Hazare says he never supported any political party : सोनिया गांधी यांच्या पुस्तकात अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला भाजप आणि आरएसएसचा छुपा पाठिंबा असल्याचा दावा करण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. यावर अण्णा हजारे यांनी संताप व्यक्त केला.
Anna Hazare
Anna HazareSaam TV
Published On: 

Anna Hazare reaction to Sonia Gandhi book claims : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनाबाबत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या पुस्तकात करण्यात आलेल्या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली. यावर अण्णा हजारे यांनी स्पष्ट शब्दांत प्रत्युत्तर दिले. कोण काय म्हणतोय किंवा राजकीय पक्ष-पार्ट्या काय बोलतात, यापेक्षा समाज आणि देश काय मानतो, हे अधिक महत्त्वाचे आहे, असे समाजसेवक अण्णा हजारे म्हणाले. (Sonia Gandhi book controversy over Anna Hazare movement)

अण्णा हजारे नेमके काय म्हणाले?

सोनिया गांधींच्या पुस्तकात दिल्लीतील आंदोलनाला भाजप आणि आरएसएसचा (RSS) छुपा पाठिंबा असल्याचा उल्लेख होता. यावर प्रतिक्रिया देताना अण्णा हजारे यांनी नाव न घेता सोनिया गांधींना खडेबोल सुनावले. कोण काय म्हणतोय किंवा राजकीय पक्ष-पार्ट्या काय बोलतात, यापेक्षा समाज आणि देश काय मानतो, हे अधिक महत्त्वाचे आहे. मी कधीही कोणत्याही पक्ष किंवा पार्टीचा विचार केला नाही आणि त्यांच्या जवळही गेलो नाही," असे अण्णांनी स्पष्ट केले.

"मला कोणी निंदा करतो की वंदन करतो, याची मी कधीही चिंता करत नाही. आपण आपले समाज आणि देशाचे काम प्रामाणिकपणे करत राहिले पाहिजे," असे अण्णा हजारे म्हणाले. ज्या रंगाचा चष्मा लावावा, त्याच रंगाचे जग दिसते. त्यांचा चष्माच तसा असल्याने त्यांना तसेच दिसणार, असा टोला अण्णा हजारे यांनी सोनिया गांधींना नाव न घेता लगावला. आपण आयुष्यभर फक्त देश आणि समाजाचा विचार केल्यामुळेच देशभरात लोकांच्या मनात आपल्याबद्दल निखळ प्रेम व आस्था असल्याचे त्यांनी सांगितले.

Anna Hazare
मॉर्निंग वॉक करताना माजी उपराष्ट्रपती अचानक कोसळले; थेट एम्समध्ये दाखल, प्रकृतीबाबत मोठी अपडेट

संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया

या वादावर बोलताना मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, "तो काळ वेगळा होता, त्याकाळी 'मी अण्णा हजारे' अशा टोप्या देखील बाजारात निघाल्या होत्या. मात्र, या मागची सत्यता कोणीही पडताळून पाहिलेली नाही. त्या काळात अजून काय-काय घडले, याचा एक वेगळा इतिहास आहे. तो इतिहास जर काढत बसलो, तर प्रत्येक नेत्यावर टीका होईल."

Anna Hazare
NCP Merger : विलीनकरणाच्या चर्चेदरम्यान मोठा राजकीय ट्विस्ट! बीडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीचे दिग्गज नेते एकत्र, नेमकं काय चाललंय?

अंबादास दानवे यांचा गंभीर आरोप

शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सोनिया गांधींच्या पुस्तकातील दाव्याचे समर्थन केले. त्यांनी अण्णा हजारेंवर गंभीर सवाल उपस्थित केले आहेत. ते म्हणाले, हे नंतर सगळ्या देशाला कळलेलं आहे. अण्णा हजारे यांना पुढे करून देशामध्ये अराजकता निर्माण करणे आणि त्याच्या बळावर स्वतःची पोळी भाजणे, हे एक षड्यंत्र होते. हे देशासमोर स्पष्ट झाल्यानंतर अण्णा हजारे त्या विषयावर का बोलले नाही? २०१४ नंतर अण्णांनी या विषयावर कधीही तोंड उघडलेले नाही.

अण्णा हजारे त्यावेळेस जे बोलत होते, याचा अर्थ त्यांच्याकडून कोणीतरी बोलून घेत होते का? हा प्रश्न जो उपस्थित झालाय आणि जो मुद्दा मांडलाय, त्यात काय चूक आहे? असा सवाल दानवेंनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.