मॉर्निंग वॉक करताना माजी उपराष्ट्रपती अचानक कोसळले; थेट एम्समध्ये दाखल, प्रकृतीबाबत मोठी अपडेट

Health Scare for Jagdeep Dhankhar: माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची मॉर्निंग वॉकदरम्यान अचानक प्रकृती बिघडली. चालताना ते बेशुद्ध पडल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Former Vice President Jagdeep Dhankhar hospitalised at AIIMS Delhi after a sudden health emergency.
Former Vice President Jagdeep Dhankhar admitted to AIIMS Delhi after collapsing during a morning walk.
Published On: 

Former VP Dhankhar collapses during morning walk, admitted to AIIMS : भारताचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची मॉर्निंग वॉकदरम्यान अचानक प्रकृती बिघडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सकाळी चालताना ते अचानक चक्कर येऊन खाली कोसळल्याने त्यांना तातडीने दिल्लीच्या एम्स (AIIMS) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या वैद्यकीय पथक त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. (Jagdeep Dhankhar Health Update)

बुधवारी सकाळी माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड मॉर्निंग वॉक करण्यासाठी घराबाहेर पडले होते. मॉर्निंग वॉक करत असतानाच ते बेशुद्ध पडले. त्यानंतर त्यांना तातडीने एम्समध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिली. जगदीप धनखड यांची प्रकृती सध्या कशी आहे हे अस्पष्ट आहे.

Former Vice President Jagdeep Dhankhar hospitalised at AIIMS Delhi after a sudden health emergency.
Maharashtra Politics: सुषमा अंधारेंचं धनंजय मुंडेंबाबत सूचक विधान अन् सर्वांच्या भुवया उंचावल्या; भर व्यासपीठावरून नेमकं काय बोलल्या?

माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या प्रकृतीबाबत एम्स प्रशासनाने त्यांच्या प्रकृतीबाबत कोणतेही आरोग्य बुलेटिन जारी केलेले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जगदीप धनखड बेशुद्ध पडल्यानंतर त्यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना पीसीआर वाहनातून घरी नेले. ते काही मिनिटे बेशुद्ध होते.

Former Vice President Jagdeep Dhankhar hospitalised at AIIMS Delhi after a sudden health emergency.
NCP Merger : विलीनकरणाच्या चर्चेदरम्यान मोठा राजकीय ट्विस्ट! बीडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीचे दिग्गज नेते एकत्र, नेमकं काय चाललंय?

पीटीआयच्या वृत्तानुसार, जगदीप धनखड यांच्यावर आयएलबीएसच्या वैद्यकीय पथकाने आणि एम्सचे डॉ. संदीप सेठ यांनी प्राथमिक उपचार केले. मात्र, माजी उपराष्ट्रपतींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना रुग्णवाहिकेने एम्समध्ये नेण्यात आले. तिथे त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.