Maharashtra Politics: सुषमा अंधारेंचं धनंजय मुंडेंबाबत सूचक विधान अन् सर्वांच्या भुवया उंचावल्या; भर व्यासपीठावरून नेमकं काय बोलल्या?

Sushma Andhare Dhananjay Munde : परळीत दिवाळी पाडव्याच्या कार्यक्रमात धनंजय मुंडे आणि सुषमा अंधारे एकाच व्यासपीठावर होते. अंधारे यांच्या राजकीय वक्तव्याने चर्चांना उधाण आले आहे.
Sushma Andhare Dhananjay Munde
Sushma Andhare Dhananjay Munde
Published On: 

योगेश काशिद, बीड प्रतिनिधी

Sushma Andhare Dhananjay Munde latest news : दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने परळी शहरातील एका दुकानाच्या (शॉपच्या) उद्घाटन सोहळ्यात माजी मंत्री धनंजय मुंडे आणि शिवसेना (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे हे दोघे एकाच व्यासपीठावर आल्याचे पाहायला मिळाले. या वेळी सुषमा अंधारे यांनी आपल्या मनोगतात धनंजय मुंडे यांना भाऊबीजेच्या शुभेच्छा देताना केलेल्या मिश्किल राजकीय वक्तव्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

सुषमा अंधारे म्हणाल्या की, "परळीला नेहमी सत्ता केंद्र असण्याची सवय आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांचा उल्लेख 'माजी मंत्री' असा करताना काहीतरी वेगळेच वाटते. भाऊबीजेच्या निमित्ताने 'भाऊ' म्हणून धनंजय मुंडे यांना माझ्या शुभेच्छा आहेत." “भाऊ, इडा-पिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे,” असे म्हणत त्यांनी पुढे मिश्किलपणे, “मी मात्र इडा-पिडा जाऊ दे आणि भाऊंचं राज्य येऊ दे, असे म्हणेन. पुढच्या दिवाळीला तुमचा उल्लेख मंत्री म्हणूनच करेन,” असे सूचक विधान केले.

Sushma Andhare Dhananjay Munde
काश्मीर हादरलं! दुचाकीवरून आलेल्या दहशतवाद्यांचा CRPF जवानांवर अंदाधुंद गोळीबार

सुषमा अंधारे यांच्या या वक्तव्यामुळे कार्यक्रमात एकच चर्चा रंगली. विशेष म्हणजे, राज्याच्या राजकारणात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलेले असतानाच, अंधारे यांनी धनंजय मुंडे यांच्याबाबत केलेल्या या वक्तव्याचे राजकीय वर्तुळात वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत.

Sushma Andhare Dhananjay Munde
Maharashtra Politics : रामदास कदम-तटकरे वादावर भरत गोगावलेंचा मोठा गौप्यस्फोट, थेट एकनाथ शिंदेंचं नाव घेतलं

भाऊबीजेच्या शुभेच्छांच्या निमित्ताने सुषमा अंधारे यांनी धनंजय मुंडे यांच्या राजकीय पुनरागमनाबाबत व्यक्त केलेली अपेक्षा सध्या राजकीय चर्चेचा विषय ठरत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.