काश्मीर हादरलं! दुचाकीवरून आलेल्या दहशतवाद्यांचा CRPF जवानांवर अंधाधुंद गोळीबार

दक्षिण काश्मीरमधील कुलगाम येथे सुरक्षा दलांच्या गस्ती पथकावर दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या घटनेत दोन जवान जखमी झाले आहेत.
two CRPF personnel injured in Kulgam attack
two CRPF personnel injured in Kulgam attack
Published On: 

two CRPF personnel injured in Kulgam attack : दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात आज दुपारी सुरक्षा दलांच्या गस्ती पथकावर दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्खोरांनी गोळीबार केला. या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) दोन जवान जखमी झाले आहेत. हा हल्ला दहशतवाद्यांनी केल्याचं वृत्त स्थानिक मीडियाकडून सूत्रांच्या हवाल्याने देण्यात आले आहे. हल्ल्यानंतर परिसराला जवानांनी वेढा घातला असून हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी २:१५ वाजताच्या सुमारास कुलगाम येथील एका नाक्यावर तैनात असलेल्या गस्ती पथकावर दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी अचानक अंधाधुंद गोळीबार केला. त्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. या हल्ल्यात जखमी झालेल्या दोन्ही जवानांना तत्काळ उपचारासाठी अनंतनाग जिल्ह्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. पसार झालेल्या हल्खोरांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.