Maharashtra Politics : रामदास कदम-तटकरे वादावर भरत गोगावलेंचा मोठा गौप्यस्फोट, थेट एकनाथ शिंदेंचं नाव घेतलं

Bharat Gogawale latest news : रामदास कदम आणि सुनील तटकरे यांच्यातील वादावर मंत्री भरत गोगावले यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. निवडणुकीपूर्वी रामदास कदम यांनीच तटकरे यांच्या नावाचे समर्थन केले होते, असे गोगावले म्हणाले.
sunil Tatkare-Bharat Gogawale
sunil Tatkare-Bharat Gogawale
Published On: 

Bharat Gogawale, Ramdas Kadam, Sunil Tatkare : सुनील तटकरे आणि रामदास कदम यांच्यातील वादामध्ये थेट शिवसेना नेते आणि मंत्री भरत गोगावले यांनी उडी घेतली आहे. निवडणुकीच्या तोंडावर तटकरे यांच्या नावाची शिफारस स्वतः रामदास कदम यांनीच केली होती आणि सर्वांनी मिळून त्यांना निवडूनही आणले, असे सांगत गोगावलेंनी दोघांमधील अचानक दुराव्यावर आश्चर्य व्यक्त केले आहे. वरच्या स्तरावर जसे नेत्यांचे जुळते, तसेच तळागाळातही समन्वय असायला हवा, अशी परखड भूमिका घेत त्यांनी घेतली. तसेच या प्रकरणात शिंदेंनी लक्ष घालावे असेही ते म्हणाले. (Bharat Gogawale latest news, Ramdas Kadam Sunil Tatkare dispute)

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) या दोन सत्ताधारी पक्षांमधील वाद, कुरबुरी आणि आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. विशेषतः रायगडच्या पालकमंत्रिपदावरून राष्ट्रवादी आणि शिवसेना थेट आमनेसामने आले होते, ज्याचे पडसाद महायुतीच्या राजकीय वर्तुळात उमटले. भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यातील हा वाद आता शांत झाला आहे असे वाटत असतानाच, त्याला आता ‘तटकरे विरुद्ध रामदास कदम’ अशी नवी किनार लाभल्याचे स्पष्ट दिसत आहे.

sunil Tatkare-Bharat Gogawale
माजी खासदार आणि सीबीआय अधिकाऱ्याचा भाजपमध्ये प्रवेश

रामदास कदम यांनी सुनील तटकरे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. 'अजित पवार यांच्या निधनानंतर सुनील तटकरे यांनी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्रिपदासाठी आमदारांना फोन केले होते का, याची चौकशी करण्यात यावी,' अशी मागणी रामदास कदम यांनी केली होती. या विधानामुळे रायगडमधील दोन्ही सत्ताधारी पक्षांमधील (शिवसेना आणि राष्ट्रवादी) अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. आता या वादावर तोडगा काढण्यासाठी आमदार भरत गोगावले यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यात लक्ष घालण्याची विनंती केली आहे.

sunil Tatkare-Bharat Gogawale
काश्मीर हादरलं! दुचाकीवरून आलेल्या दहशतवाद्यांचा CRPF जवानांवर अंदाधुंद गोळीबार

गोगावले नेमकं काय म्हणाले?

रामदास कदम आमचे सीनियर नेते आहेत. निवडणूक जाहीर होण्याच्या आधीच रामदास कदम यांनी तटकरे यांच्या नावाचे समर्थन केले होते आणि त्यांना निवडून आणण्यासाठी प्रामाणिकपणे काम केले होते. पण त्यानंतर रामदास कदम आणि तटकरे यांच्यामध्ये नेमके काय घडले? याची आपल्याला कल्पना नाही आणि आपण कधी त्याबद्दल विचारणाही केली नाही, असे भरत गोगावले म्हणाले.

वरच्या पातळीवर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे जसे ट्युनिंग जुळते, तसेच तळागाळातही जुळायला हवे, असे मलाही वाटतेय. या प्रकरणाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दखल घेऊन लवकरच त्यावर काही ना काही तोडगा काढतील, असा विश्वास असल्याचे गोगावले म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.