पंजाबमधील अमृतसर ते वाराणसी दरम्यान प्रस्तावित वंदे भारत स्लीपर ट्रेनची प्रतीक्षा अखेर संपली आहे. ही ट्रेन आता 17 जुलैपासून धावणार असून यापूर्वी ती 12 जुलैपासून सुरू करण्याचे नियोजन होते. मात्र रेल्वे प्रशासनाने सुधारित वेळापत्रक जाहीर करत नवी तारीख निश्चित केली आहे. या ट्रेनला संत रविदास एक्सप्रेस असे नाव देण्यात आले असून ती आठवड्यातून तीन दिवस धावणार आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै रोजी जालंधर येथून व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवू शकतात.
याच दिवशी जालंधरमधील नव्याने बांधलेल्या रेल्वे स्थानकाचे उद्घाटनही होण्याची शक्यता आहे. वेळापत्रकानुसार, छेहर्टा-वाराणसी संत रविदास एक्स्प्रेस (14624) प्रत्येक बुधवार, शुक्रवार आणि रविवार दुपारी 2.05 मिनिटांनी छेहर्टा येथून सुटेल. ही ट्रेन रात्री 12.10 वाजता लखनऊ येथे पोहोचेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 12.15 वाजता वाराणसीला पोहोचेल. तसेच अमृतसर येथे 2.25 वाजता पोहोचून 2.30 वाजता वाराणसीकडे प्रस्थान करेल.
या मार्गावर अमृतसर, जालंधर सिटी, लुधियाना, अंबाला कॅंट, सहारनपूर, मुरादाबाद, बरेली, शाहजहांपूर, लखनऊ, सुलतानपूर आणि जौनपूर सिटी या प्रमुख स्थानकांवर ट्रेन थांबणार आहे. त्यामुळे पंजाब आणि उत्तर प्रदेशातील प्रवाशांना जलद आणि थेट रेल्वे सेवाचा मोठा फायदा होणार आहे.या ट्रेनचे प्राथमिक देखभाल कार्य छेहर्टा रेल्वे स्थानकावर केले जाणार आहे. परतीच्या प्रवासात, वाराणसी-छेहर्टा संत रविदास एक्सप्रेस (14623) प्रत्येक गुरुवार, शनिवार आणि सोमवार रोजी संध्याकाळी 7:50 वाजता वाराणसीहून सुटेल. नव्या वंदे भारत स्लीपर सेवेने दोन राज्यांतील प्रवास अधिक सोयीस्कर, जलद आणि आरामदायी होणार असल्याचे मानले जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.