Plane Accident : भीषण अपघात! विमान धावपट्टीवरून घसरलं, क्षणात पेट घेतला; ५ जणांचा मृत्यू

Plane Accident News : अमेरिकेतील मियामी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मालवाहू विमानाचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून FAA आणि NTSB कडून तपास सुरू आहे.
America Plane Accident News
America Plane Accident News Saam Tv
Published On
Summary
  • अमेरिकेतील मियामी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मालवाहू विमानाचा भीषण अपघात

  • विमान धावपट्टीबाहेर जाऊन काही वाहनांना धडकले

  • विमानाला आग लागून खाक

  • ५ जणांचा दुर्घटनेत मृत्यू

अमेरिकेतून मोठी बातमी समोर आली आहे. अमेरिकेतील मियामी आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी 'अमेझॉन प्राईम एअर' च्या मालवाहू विमानाचा भीषण अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार, धावपट्टीवरून विमान घसरून बाहेर गेल्यानंतर अनेक वाहनांना धडक बसली आणि विमानाला आग लागली. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बोईंग ७६७-३०० हे मालवाहू विमान अमेझॉन एअरसाठी काम करत असलेल्या २१ एअर कंपनीकडून चालवले जात होते. Prime Air Flight 7598 हे विमान पोर्तो रिकोमधील सॅन हुआन येथून मियामीकडे आले होते. रविवारी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास विमान मियामी विमानतळावरील धावपट्टीवर उतरण्याचा प्रयत्न करत असताना धावपट्टीच्या पुढे गेले.

America Plane Accident News
Kidney Stone : तुम्हाला किडनी स्टोन झालाय? ३० दिवस आधी दिसतील 'ही' लक्षणे, दुर्लक्ष कराल तर....

विमानाने धावपट्टी ओलांडल्यानंतर काही वाहनांना धडक दिली. त्यानंतर विमानाला आग लागली आणि परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले. अपघाताची माहिती मिळताच बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मियामी-डेड फायर रेस्क्यूच्या टीमने घटनास्थळी पोहोचून आग विझवण्याचे काम केले. अपघातानंतर विमानतळावरील सर्व धावपट्ट्या आणि रस्ते मार्ग काही काळ बंद करण्यात आले. विमानांच्या वेळापत्रकावरही मोठा परिणाम झाला आणि विमानतळावर ग्राउंड स्टॉप लागू करण्यात आला.

America Plane Accident News
Supreme Court : सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! निवृत्तीचे वय आता ६२, महाराष्ट्रासह ७ राज्यांमध्ये नियम बदलणार

या दुर्घटनेचा तपास आता सुरू करण्यात आला आहे. अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने (FAA) या अपघाताची चौकशी करणार असल्याचे सांगितले आहे. तसेच नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड (NTSB) देखील घटनास्थळावरून माहिती आणि पुरावे गोळा करत आहे. विमान धावपट्टीवरून नेमके का घसरले आणि अपघातामागे कोणती कारणे होती, याचा तपासातून उलगडा होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com