आता अमेरिका करणार इराणमध्ये सागरी नाकेबंदी, भारतावर मोठा परिणाम होणार

Crude oil price today global : अमेरिकेने इराणविरोधात सागरी नाकेबंदीचा इशारा दिल्यानंतर जागतिक बाजारपेठेत खळबळ उडाली आहे.
US Iran tensions
US Iran tensionsANI
Published On

US Iran naval blockade impact on global oil prices : इस्लामाबादमधील अमेरिका आणि इराणमधील चर्चेची फेरी निष्फळ ठरल्यानंतर, डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधात अत्यंत कठोर पाऊल उचललंय. अमेरिका इराणची सागरी नाकेबंदी करणार आहे. इराणच्या सर्व बंदरांवर येणाऱ्या आणि जाणाऱ्या जहाजांवर पूर्णपणे बंदी घालण्यात येणार आहे. .ही बंदी केवळ इराणी जहाजांपुरती मर्यादित नाही. कोणत्याही देशाचे जहाज इराणी बंदरात शिरल्यास किंवा तिथून बाहेर पडल्यास त्यावर कारवाई केली जाणार आहे....त्यामुळे जागतिक इंधन पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे आखाती देशांमधील तणाव अधिक वाढला आहे. ट्रम्प यांच्या निर्णायाचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होण्याची चिन्हे आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा आक्रमक भूमिकेत आले आहेत. प्रादेशिक अस्थिरता टाळण्यासाठी पूर्ण युद्धाऐवजी इराणमधील काही निवडक ठिकाणांवर मर्यादित लष्करी हल्ले करण्याचा पर्याय अमेरिका पडताळून पाहत असल्याचे समोर आले. पूर्णवेळ युद्ध टाळून इराणवर दबाव निर्माण करण्यासाठी निवडक लष्करी तळांवर किंवा ठिकाणांवर हल्ले करण्याची शक्यता आहे. इराणवर दबाव वाढवून चर्चेतील कोंडी फोडणे हा यामागील मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात येत आहे. वॉशिंग्टनमध्ये युद्धाच्या विविध पर्यायांची चाचपणी सुरू झाली असून डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत.

US Iran tensions
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींसाठी आदिती तटकरेंचे खास ट्वीट, ईकेवायसीवर म्हणाल्या...

'अमेरिकेची नाकेबंदी धमकी हास्यास्पद' इराणच्या नौदल प्रमुखांनी उडवली खिल्ली

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या सागरी नाकेबंदीबाबत दिलेल्या धमकीला इराणने चोख प्रत्युत्तर दिले आहे. इराणचे नौदल प्रमुख शहरम इराणी यांनी ट्रम्प यांची ही धमकी हास्यास्पद' असल्याचे सांगत उघडपणे खिल्ली उडवली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणची सागरी नाकेबंदी करण्याची धमकी दिली होती, ज्यावर इराणने कडक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकन सैन्याच्या कोणत्याही आक्रमक पवित्र्याला उत्तर देण्यासाठी इराणचे जवान पूर्णपणे सज्ज आहेत, असा इशारा शहरम इराणी यांनी दिला आहे. इराणचे नौदल अशा कोणत्याही धमक्यांना भीक घालत नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले आहे.

US Iran tensions
Accident : वऱ्हाडाची बस ट्रकला धडकली, ६ जणांचा जागीच मृत्यू; अनेकजण गंभीर, अपघाताचा व्हिडिओ समोर

जागतिक बाजारपेठेत खळबळ -

अमेरिकेने इराणच्या महत्त्वाच्या बंदरांची नाकेबंदी जाहीर केल्यामुळे जागतिक बाजारपेठेत खळबळ उडाली आहे. यामुळे कच्च्या तेलाचे दर 7 ते 8 टक्क्यांनी वधारले आहेत. अमेरिकन क्रूड ऑईलचे दर 8 टक्क्यांनी वधारून प्रति बॅरल 104.24 डॉलर्सवर पोहोचलंय....तर ब्रेंट क्रूड 102.29 डॉलर्सवर पोहोचलंय.. भूराजकीय तणावामुळे इंधन दरवाढीचं संकट पुन्हा गडद झाले आहे.

US Iran tensions
Ladki Bahin yojana : ₹१५०० चा हप्ता बंद का झाला? लाडक्या बहिणींना ‘या’ कार्यालयात समजणार नेमके कारण; ३००० रूपयांची अपडेट समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com