Accident : वऱ्हाडाची बस ट्रकला धडकली, ६ जणांचा जागीच मृत्यू; अनेकजण गंभीर, अपघाताचा व्हिडिओ समोर

Hapur road accident, bus truck collision : उत्तर प्रदेशातील हापुडमध्ये वऱ्हाडाची बस आणि ट्रकच्या भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला. अनेकजण गंभीर जखमी असून बचावकार्य सुरू आहे.
Hapur bus truck accident
Hapur bus truck accidentANI
Published On

Road Accident Death : मध्यरात्री वऱ्हाडाची बस आणि ट्रकच्या झालेल्या भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात अनेकजण गंभीर जखमी झाले आहे. उत्तर प्रदेशमधील हापुडमध्ये हायवेवर हा भयंकर अपघात झालाय. अपघातानंतर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. अपघातानंतरचे भयानक दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. बसमध्ये अडकलेल्या लोकांना तात्काळ बाहेर काढून उपचारासाठी रूग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे. (Hapur bus truck accident latest news Uttar Pradesh)

उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याच्या माहितीला पोलिसांनी दुजोरा दिला. धौलाना-गुलावती महामार्गावर मध्यरात्री हा अपघात झाला. लग्नाचे पाहुणे घेऊन जाणारी बस आणि ट्रक यांच्यात जोरदार धडक झाली. या धडकेत सहा जणांच्या मृत्यू झाला. त्याशिवाय अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. पलिसांनी आणि गावकऱ्यांनी तात्काळ बसमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. जवळच्या रूग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत.

Hapur bus truck accident
Vande Bharat Sleeper : महाराष्ट्राला मिळाली पहिली वंदे भारत स्लीपर, कुठून कुठे धावणार? कोणती स्थानके? वाचा A टू Z माहिती

धौलाना-गुलावती महामार्गावर लग्नाच्या पाहुण्यांना घेऊन जाणाऱ्या बसची एका ट्रकसोबत जोरात धडक झाल्याची माहिती एसपी ज्ञानंजय सिंह यांनी दिली. ते म्हणाले की, अपघाताची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तात्काळ बचावकार्य सुरू केले. जखमींना बसमधून बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले. पण या दुर्दैवी अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला. इतर सात जण गंभीर जखमी आहेत. काही जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. मृतांपैकी एका व्यक्तीची ओळख अद्याप पटली नाही, तो चालक असावा.

Hapur bus truck accident
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रात संतापाची लाट! लाडक्या बहि‍णीकडे शरीरसुखाची मागणी, eKYC साठी घरी गेला अन्...

बस आणि ट्रक दोन्हीचा या अपघातानंतर चुराडा झाल्याचे व्हिडिओत दिसतेय. व्हिडिओवरून हा अपघात किती भीषण होता हे स्पष्ट दिसत आहे. अपघातानंतर महामार्गावर जोरदार वाहतूककोंडी झाली होती. पोलिसांनी तात्काळ क्रेनच्या साहाय्याने ट्रक रस्त्यावरून बाजूला केली. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली आहे. मृतांच्या कुटुंबीयांना पोलिसांकडून अपघाताबाबत माहिती देण्यात आली आहे. पोलिसांनी ६ जणांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. पोलिसांकडून या अपघाता प्रकरणी पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.

Hapur bus truck accident
PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! पीएम किसानचा २३ वा हप्ता हवाय? मग 'हे' काम लगेच करा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com