Jharkhand building collapse : सूरतनंतर आणखी एका ठिकाणी इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याची शक्यता, मदतकार्य सुरु

Jharkhand building collapse Update : सूरतनंतर आणखी एका ठिकाणी इमारती कोसळल्याची घटना घडली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सूरतनंतर आणखी एका ठिकाणी इमारती कोसळली; ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याची शक्यता, मदतकार्य सुरु
Jharkhand building collapse Update : Saam tv
Published On

झारखंड : गुजरातच्या सूरतमध्ये इमारत कोसळल्याची घटना ताजी असताना झारखंडमध्ये बहुमजली इमारती कोसळली आहे. झारखंडच्या देवघरमध्ये बहुमजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली ६ ते ७ जण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफचं पथक घटनास्थळी पोहोचलं आहे. या पथकाने मदतकार्यही सुरु केलं आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, झारखंडमधील देवघरचे आयुक्त विशाल सागर यांनी सांगितलं की, देवघरच्या सीता हॉटेलजवळील एक इमारत कोसळल्याची घटना घडली. इमारत कोसळ्याची घटना घडताच एनडीआरएफ आणि आरोग्य विभागाचं पथक घटनास्थळी मदतकार्यासाठी पोहोचलं आहे. अग्निशमन दल आणि पोलीस विभागाकडून मदतकार्य सुरु आहे. घटनास्थळी रुग्णावाहिका देखील आणण्यात आल्या आहेत.

सूरतनंतर आणखी एका ठिकाणी इमारती कोसळली; ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याची शक्यता, मदतकार्य सुरु
Nagar Manmad Highway Accident : योजनेचा लाभ घेण्याची इच्छा अधुरीच राहिली; तहसील कार्यालयाकडे जाताना वाहनाने उडवले, महिला जागीच ठार

देवघरच्या आयुक्ताच्या माहितीनुसार, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली ६ ते ७ लोक अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. स्थानिक लोकांनी दोन लहान मुलांना सुरक्षितपणे रेस्क्यू केलं आहे. सध्या घटनास्थळी खासदार निशिकांत दुबे आणि देवघर पोलीस अधिक्षक उपस्थित आहेत.

सूरतनंतर आणखी एका ठिकाणी इमारती कोसळली; ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याची शक्यता, मदतकार्य सुरु
Wardha ST Bus Accident : कारंजा राष्ट्रीय महामार्ग भरधाव एसटी बसने तब्बल ११ शेळ्यांना चिरडलं, अंगाचा थरकाप उडवणारा VIDEO समोर

खासदार निशिकांत दुबे यांनी म्हटलं की, 'झारखंडच्या देवघरमध्ये आज रविवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास बमबम झा मार्गावर तीन मजली इमारत कोसळली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तातडीने एनडीआरएफचं पथक पाठवलं आहे. सकाळापासून भाजपचे वरिष्ठ नेते, स्थानिक लोकांसोबत घटनास्थळी उपस्थित आहे. स्थानिक लोकांनी आतापर्यंत ३ लोकांना सुरक्षितपणे रेस्क्यू केलं आहे. तर एनडीआरएफने १ महिलेला रेस्कू केलं आहे. मदतकार्य सुरु आहे. या घटनेतील जखमींना देवघरमधील एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com