गुजरात : गुजरातमधील सूरतमध्ये शनिवारी सहा मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. इमारत कोसळल्यानंतर घटनास्थळी एनडीआएफ, फायर ब्रिगेडचं पथकाने बचाव कार्य सुरु केलं आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून ७ मृतदेह बाहेर काढले आहेत. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी लोक अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. इमारत कोसळल्याच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
इमारत कोसळल्याची घटना घडल्याची माहिती मिळताच प्रशासनाचे अधिकारी, सूरत महानगर पालिकेचे महापौर दक्षेश मावानी, उपमहापौर नरेंद्र पाटील, भाजप आमदार संदीप देसाई आणि विरोधी पक्षनेत्या पायल साकरियासहित अन्य नेते हजर झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सहा मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली. इमारत कोसळल्याने अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले. आतापर्यंत या घटनेत ७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
सूरत पोलीस आयुक्त अनुपम गहलोत यांनी म्हटलं की, 'एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या पथकाने मदतकार्याला सुरुवात केली आहे. या इमारतीच्या पाच फ्लॅटमध्ये लोक राहत होते. त्यामुळे या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आतापर्यंत या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून ७ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत'.
'या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून एका महिलेला बाहेर काढण्यात आलं. या घटनेत महिला जखमी झाली आहे. या महिलेची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. पालिकेने या धोकादायक इमारतीला नोटीस देखील बजावली होती. घटनास्थळी एफएसएल पथकाकडून तपास सुरु आहे. पोलीस एफआयआर नोंद करुन पुढील कारवाई करणार आहे', असेही त्यांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरतमधील ही इमारात २०१७ साली बांधण्यात आली होती. त्यानंतर ही इमारत २०२४ मध्ये कोसळली आहे. ३२ फ्लॅट असलेल्या इमारतीत बहुतेक कुटुंब भाडेतत्वावर राहत होते. या इमारतीत बहुतेक कामगार राहत होते. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली किती कुटुंबातील लोक अडकले, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून एका महिलेला सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. सूरत अग्निशमन विभाग, पोलीस दल, एनडीआरएफचं पथकाकडून मदतकार्य सुरु आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.