Uddhav Thackeray Interview
Uddhav Thackeray Interview Saam tv

Uddhav Thackeray Interview : शिवरायांनी सूरत लुटली, त्याचा राग मोदी-शहा महाराष्ट्रावर काढताहेत का? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

Uddhav Thackeray Interview News : 'छत्रपती शिवाजी महाराज यांनी सूरतमधील इंग्रजांच्या वखारी लुटल्या, त्याचा राग मोदी-शहा शिवसेना आणि महाराष्ट्रावर काढत आहेत काय? असा सवाल करीत उद्धव ठाकरेंनी जोरदार हल्ला चढवला.

मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीच्या दुसऱ्या भागात भाजपवर जोरदार टीका केली आहे. 'छत्रपती शिवाजी महाराज यांनी सूरतमधील इंग्रजांच्या वखारी लुटल्या, त्याचा राग मोदी-शहा शिवसेना आणि महाराष्ट्रावर काढत आहेत काय? असा सवाल करीत उद्धव ठाकरेंनी जोरदार हल्ला चढवला. यावेळी मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी मोदी शहा यांच्या नीतीवरही टीकास्त्र सोडलं.

उद्धव ठाकरेंनी यावेळी भाजपवर टीका करताना मोठं विधान केलं. शिवसेनेनं २०१४ ला भाजप व्यतिरिक्त नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देण्याचं पाप केलं, असं म्हणत ठाकरेंनी निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांनी पुढे सांगितलं की, आम्ही २०१४ च्या लोकसभेसाठी पाठिंबा दिला. मात्र, चार ते पाच महिन्यांमध्ये भाजपने विधानसभेच्या वेळी युती तोडली, तेव्हा मी काँग्रेससोबत गेलो नव्हतो', असे ते म्हणाले.

Uddhav Thackeray Interview
Fourth Phase Voting : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी उद्या मतदान, राज्यातील 11 जागांवर मतदार देणार कौल

'ज्यावेळी भाजपचे दोन खासदार होते, त्यावेळी भाजप हिंदुत्ववादी नव्हता, तर गांधीवादी होता. तेव्हा पार्ल्याची निवडणूक शिवसेनेने हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जिंकली. तेव्हा गांधीवादी भाजप शिवसेनेच्या भूमिकेमुळे हिंदुत्वाकडे वळला, अशी टीका ठाकरे यांनी केली.

'माझ्या आजारपणात हुडी घालून माझेच लोक माझा पक्ष खाली खेचायला निघाले होते. एकीकडे मोदी म्हणतात की माझं शिवसेनेवर प्रेम आहे, हे मोदी यांचे चायनीज प्रेम आहे. मोदी यांच्या कार्यकाळाला दहा वर्षे झाली. आता हिंदूंचा कैवारी म्हणून कोणी या पक्षाला बोलतच नाही. आजही हिंदूंना आक्रोश मोर्चे काढावे लागतात, असे ते म्हणाले.

Uddhav Thackeray Interview
Anna Hajare: ईडीसारखे गुन्हे असलेले राजकारणी नको; निष्कलंक उमेदवार निवडा', ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचे आवाहन

'स्वातंत्र्यलढ्यात कुठेही नसलेल्या भाजपने मला हिंदुत्व शिकवावं? त्यांनी चले जाव सारख्या नाऱ्याला देखील विरोध केला होता. काँग्रेस स्वातंत्र्य लढ्यामध्ये उतरली होती. या लोकांनी तत्कालीन मुस्लिम लीगच्या मांडीला मांडी लावून देशाची फाळणी, बंगाल फाळणीच्या विषयावर पाठिंबा दिला, अशी टीका ठाकरेंनी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com