Fourth Phase Voting :
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सोमवारी 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 96 लोकसभा जागांवर मतदान होणार आहे. त्यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. यातच राज्यातील 11 लोकसभेच्या जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
चौथ्या टप्प्यात राज्यात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड लोकसभेच्या जागांवर मतदान होणार आहे.
या टप्प्यात आंध्र प्रदेश आणि ओडिशा विधानसभा निवडणुकीसाठीही मतदान होत आहे. अनेक भागात मतदान साहित्य आणि मतदान पथके हवाई मार्गाने पाठवण्यात आली आहेत. सोमवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान होणार आहे. तेलंगणातील 17 लोकसभा मतदारसंघातील काही विधानसभा मतदारसंघात मतदानाची वेळ सायंकाळी 7 वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे.
चौथ्या टप्प्यात आंध्र प्रदेशातील सर्व 25, तेलंगणातील 17, उत्तर प्रदेशातील 13, महाराष्ट्रातील 11, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेशातील प्रत्येकी 8, बिहारमधील 5, ओडिशा आणि झारखंडमधील प्रत्येकी 4 आणि जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेश 1 जागेवर मतदान होणार आहे. निवडणुकीच्या या टप्प्यात मोदी सरकारचे 5 मोठे मंत्री, एक माजी मुख्यमंत्री, 2 क्रिकेटपटू आणि एका अभिनेत्यासह अनेक ज्येष्ठ राजकारण्यांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे.
या टप्प्यात, 19 लाखांहून अधिक मतदान अधिकारी 1.92 लाख मतदान केंद्रांवर 17.7 कोटी मतदारांना मदत करतील. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, चौथ्या टप्प्यासाठी 85 वर्षांपेक्षा जास्त वयाचे 12.49 लाखांहून अधिक नोंदणीकृत मतदार आणि 19.99 लाख अपंग मतदार आहेत. ज्यांना त्यांच्या घरातूनच मतदान करण्याचा पर्याय देण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.