Raj Thackeray: महाराष्ट्रात फोडाफोडीचं राजकारण शरद पवार यांनीच सुरु केलं, राज ठाकरेंचा पवारांवर घणाघात

Lok Sabha Election 2024: शरद पवार यांनीच महाराष्ट्रात फोडाफोडीचं राजकारण केलं. सर्वात पहिला पक्ष त्यांनी १९७८ मध्ये फोडला, पुढे १९९१ ला छगन भुजबळांना शिवसेनेतून फोडलं आणि २००४ ला नारायण राणेंना काँग्रेसने फोडलं: राज ठाकरे
महाराष्ट्रात फोडाफोडीचं राजकारण शरद पवार यांनीच सुरु केलं, राज ठाकरेंचा पवारांवर घणाघात
Raj Thackeray On Sharad pawarSaam Tv
Published On

Raj Thackeray On Sharad pawar:

''शरद पवार यांनीच महाराष्ट्रात फोडाफोडीचं राजकारण केलं. सर्वात पहिला पक्ष त्यांनी १९७८ मध्ये फोडला, पुढे १९९१ ला छगन भुजबळांना शिवसेनेतून फोडलं आणि २००४ ला नारायण राणेंना काँग्रेसने फोडलं, तेंव्हा हे आत्ता रडणारे कुठे होते, तेंव्हा का नाही काही बोलले'', असं म्हणत राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर हल्लाबोल केला आहे. आज ठाणे येथे महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्या प्रचार सभेत ते असं म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करत ते म्हणाले की, ''२०१९ ला उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत विधानसभेची निवडणूक लढवली, पण निकालांनंतर जेंव्हा उद्धव ठाकरेंच्या लक्षात आलं की आपल्याशिवाय भाजपच सरकार बसणार नाही, तेंव्हा त्यांनी पिल्लू सोडलं की अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचं ठरलं होतं. आणि काय तर म्हणे बंद खोलीत ठरलं होतं, मग ते आधीच का नाही सांगितलं?''

महाराष्ट्रात फोडाफोडीचं राजकारण शरद पवार यांनीच सुरु केलं, राज ठाकरेंचा पवारांवर घणाघात
Raj Thackeray: बाहेरचे लोंढे थांबणार नाही, तोवर विकास होणार नाही, परप्रांतीयांच्या मुद्द्यावरून राज ठाकरे पुन्हा आक्रमक

राज ठाकरे म्हणाले की, ''विधानसभेच्या प्रचाराच्या वेळेस जेंव्हा नरेंद्र मोदी आमचे पुढचे मुख्यमंत्री अमित शाह आहेत म्हणून सांगत होते, तेंव्हा का नाही विरोध केलात? बरं, समजा जर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद मिळालं असतं, तर त्यांनी विरोध केला असता का? आज महाराष्ट्राच्या राजकारणाचा जो पार विचका झाला आहे, कोण कुठे आहे, हे कळत नाहीये याला जबाबदार उद्धव ठाकरेच आहेत.''

महाराष्ट्रात फोडाफोडीचं राजकारण शरद पवार यांनीच सुरु केलं, राज ठाकरेंचा पवारांवर घणाघात
Raj Thackeray : राज ठाकरेंकडून पुन्हा लाव रे तो व्हिडिओ; सुषमा अंधारेंचा तो व्हिडिओ चालवत उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

'आनंद दिघेंच्या सोबत माझे मैत्रीपूर्ण संबंध होते'

सभेत येण्याआधी राज ठाकरे हे आनंद मठात गेले होते. या सभेत आनंद दिघे यांच्या आठवणींना उजाळा देत राज ठाकरे म्हणाले, ''सभेला यायच्या आधी आनंद मठात गेलो होतो. तेंव्हा सगळे जुने दिवस आठवले. आनंद दिघेंच्या सोबत माझे मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यांच्यासोबत ठाणे फिरताना मजा यायची. मी बाळासाहेबांसोबत अनेकदा ठाण्याला आलो आहे. तेंव्हाच ठाणे खूप सुंदर आणि टुमदार शहर होतं. पण आज सगळं चित्र बदललं आहे. एके काळचं तलावांच शहर टँकरचं शहर झालंय. हे शहर म्हणजे काँक्रीटचं जंगल झालं आहे.''

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com