Raj Thackeray : राज ठाकरेंकडून पुन्हा लाव रे तो व्हिडिओ; सुषमा अंधारेंचा तो व्हिडिओ चालवत उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Lok Sabha Election 2024 : सुषमा अंधारेंनी काही वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर भर सभेत टीका केली होती. तो व्हिडिओ चालवत आज राज ठाकरे यांनी वडील चोरल्याच्या आरोंपांवरून उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.
Raj Thackeray
Raj ThackeraySaam Digital

सुषमा अंधारेंनी काही वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर भर सभेत टीका केली होती. तो व्हिडिओ चालवत आज राज ठाकरे यांनी वडील चोरल्याच्या आरोंपांवरून उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. ठाणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांच्या प्रचारार्थ आज सभा पार पडली. या सभेत राज ठाकरेंनी शरद पवार यांच्यावरही पक्षफोडीच्या राजकारणावरून निशाणा साधला. पक्ष फोडीचं राजकारण शरद पवारांपासून सुरू झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे यांनी कालच्या सभेत एकनाथ शिंदे यांच्यावर माझे वडील (बाळासाहेब ठाकरे) चोरल्याचा आरोप केला होता. हिंमत असेल तर स्वत: वडिलांच्या नावावर मतं मागा, अशी बोचरी टीका त्यांनी केली होती. त्या विधानावरून राज ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला.

उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र निर्माण सेनेचे ६ नगरसेवक फोडले होते. मागितले असते तर दिले असते, मात्र फोडून नेले. फोडाफोडीचं राजकारण शरद पवारांपासून सुरू झालं आणि आज महाविकास आघाडीचे नेते फोडाफोडीवरून आरोप करतायेत. उद्धव ठाकरे वडील चोरल्याची भाषा करतात. मात्र ज्यांनी काही वर्षांपूर्वी बाळासाहेबांवर खालच्या़ पातळीवर टीका केली, त्यांना सोबत घेतलंय. त्यांना सोबत घेताना वडील आठवले नाहीत का? असा सवाल करत त्यांनी सुषमा अंधारेंचा तो व्हिडिओ लावला. ज्यात सुषमा अंधारे बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका करताना दिसत आहेत.

Raj Thackeray
Raj Thackeray: बाहेरचे लोंढे थांबणार नाही, तोवर विकास होणार नाही, परप्रांतीयांच्या मुद्द्यावरून राज ठाकरे पुन्हा आक्रमक

राज ठाकरेंनी यावेळी ठाण्यातील परप्रांतियांच्या संख्येवरही प्रकाश टाकला. परप्रांतियांचं सगळ्यात जास्त प्रमाण हे ठाणे जिल्ह्यात आहे. आधी ग्रामपंचाय, नंतर नगरपरिषद, नंतर महानगरपालिका, हे सगळं ठरतं ते लोकसंख्येवरुन. बाकीच्या जिल्ह्यात एखादी महानगर पालिका आहे. मात्र ठाण्यात सात ते आठ महानगरपालिका आहेत. परप्रांतियांचे लोंढे थांबवले नाहीतर तर कितीही रस्ते केले, पूल बांधले तरी काहीही फरक पडणार नाही. मूळ माणसाच्या हाती काहीही पडणार नाही. त्यामुळे श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांनी दिल्लीत गेल्यानंतर हे लोंढे थांबवा, असं सांगितलं पाहिजे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Raj Thackeray
Pimpari Chinchwad News: पिंपरी चिंचवडमध्ये पोस्टर वॉर? चौकामध्ये लागलेल्या फ्लेक्सवर अश्विनी जगताप यांनी केला खुलासा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com