Pimpari Chinchwad News: पिंपरी चिंचवडमध्ये पोस्टर वॉर? चौकामध्ये लागलेल्या फ्लेक्सवर अश्विनी जगताप यांनी केला खुलासा

Ashwini Laxman Jagtap: पिंपरी चिंचवड शहरातील नवी सांगवी आणि पिंपळे गुरव परिसरामध्ये ऐन लोकसभा निवडणुकीच्या आदल्या दिवशी आज सकाळी बॅनरबाजी करण्यात आली होती. या बॅनर बाजीचा अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी तीव्र निषेध केला आहे.
Ashwini Laxman Jagtap
Ashwini Laxman JagtapSaam Tv

Pimpari Chinchwad News:

>> गोपाळ मोटघरे

पिंपरी चिंचवड शहरातील नवी सांगवी आणि पिंपळे गुरव परिसरामध्ये ऐन लोकसभा निवडणुकीच्या आदल्या दिवशी आज सकाळी बॅनरबाजी करण्यात आली होती. या बॅनर बाजीचा दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांची पत्नी आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप आणि पिंपरी चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी तीव्र निषेध केला आहे.

आमदार लक्ष्मण जगताप यांचे कट्टर समर्थक कधीही, असं बॅनर बाजी करून असं भेकड काम करणार नाही. महायुतीत आम्ही सर्वजण मावळ लोकसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग अप्पा बारणे यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असा खुलासा आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी केला आहे.

हीच ती वेळ आहे, भाऊच्या विरोधकांना त्यांची जागा दाखविण्याची अशा आषयाचे निनावी बॅनर बाजी आज सकाळी नवी सांगवी आणि पिंपळे गुरव परिसरात करण्यात आली होती. त्याचा अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी तीव्र निषेध केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com