Afghanistan-Pakistan Conflict: भारताशेजारी युद्ध सुरू, २७४ तालिबानी तर ५५ पाकिस्तानी सैन्यांचा मृत्यू

Afghanistan Attack On Pakistan: पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन्ही देशांमध्ये सध्या युद्ध सुरू आहे. दोन्ही देशांमध्ये ताणापूर्ण परिस्थिती आहे. पाकिस्तानचे ५५ सैन्य तर अफगाणिस्तानचे २७४ सैन्य मारले गेले आहेत.
Afghanistan-Pakistan Conflict: भारताशेजारी युद्ध सुरू, २७४ तालिबानी तर ५५ पाकिस्तानी सैन्यांचा मृत्यू
Afghanistan-Pakistan ConflictSaam Tv
Published On

Summary -

  • अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू

  • दोन्ही देशांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती

  • पाकिस्तानचे ५५ सैन्य मारले गेल्याचा अफगाणिस्तानचा दावा

  • तर तालिबानचे २७४ सैन्य मारले गेल्याचा पाकिस्तानचा दावा

भारताच्या शेजारचे देश पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये जोरदार युद्ध सुरू आहे. दोन्ही देशामधील परिस्थिती गंभीर आहे. अफगाणिस्तानने पाकिस्तानवर मोठा हल्ला केला आहे. पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या १५ चौक्यांवर ताबा मिळवल्याचा दावा अफगाणिस्तानने केला आहे. अफगाणिस्तानच्या कारवाईत अनेक पाकिस्तानी सैनिक मारले गेल्याचे सांगितले जात आहे. काही सैनिकांना ताब्यात घेतल्याचाही दावा केला जात आहे.

अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या युद्धामध्ये मोठ्याप्रमाणात सैन्यांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानने २७४ तालिबानी सैन्यांना मारल्याचा दावा केला आहे. तर अफगाणिस्तानने पाकिस्तानच्या ५५ सैन्यांना ठार केल्याचा दावा केला आहे. दोन्ही देशांमध्ये अजूनही युद्ध सुरूच आहे. दोन्ही देशांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती आहे. नागरिक देखील प्रचंड घाबरले आहेत.

Afghanistan-Pakistan Conflict: भारताशेजारी युद्ध सुरू, २७४ तालिबानी तर ५५ पाकिस्तानी सैन्यांचा मृत्यू
Pakistan Afghanistan conflict : तालिबानचा थरकाप उडवणारा प्रहार, पाकिस्तानचे JF-17 विमान पाडले, ५५ सैनिकांचा मृत्यू अन्...

पाकिस्तानने अफगाणिस्तानातील दांड अव पाटन भागातील निवासी भागांवर हल्ला करून प्रत्युत्तर दिले. या लष्करी कारवाईचे व्हिडिओ समोर येत आहेत. अफगाण संरक्षण मंत्रालयाने एक महत्त्वाचा दावा केला आहे, ज्यामध्ये अफगाण सैन्याच्या कारवाईत ५५ पाकिस्तानी सैनिक मारले गेल्याचा दावा करण्यात आला आहे. १३ पाकिस्तानी सैनिकांचे मृतदेह पाकिस्तानला सुपूर्द करण्यात आले आहेत.

Afghanistan-Pakistan Conflict: भारताशेजारी युद्ध सुरू, २७४ तालिबानी तर ५५ पाकिस्तानी सैन्यांचा मृत्यू
Pakistan Afghanistan conflict : पाकिस्तानकडून युद्धाची घोषणा, १३३ तालिबानी मारल्याचा दावा, वाचा १० मोठ्या अपडेट

पाकिस्तानने राजधानी काबूल, पक्तिका आणि कंधारमधील अनेक ठिकाणी बॉम्बहल्ला केल्याची पुष्टी अफगाणिस्तानातील तालिबान सरकारचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी केली. या हल्ल्यांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही असा दावा देखील त्यांनी केला. तर पाकिस्तान सरकारने दावा केला की, त्यांच्या लष्करी कारवाईत आतापर्यंत अफगाण तालिबानचे २७४ सदस्य मारले गेले आहेत आणि २०० जण जखमी झाले आहेत.

Afghanistan-Pakistan Conflict: भारताशेजारी युद्ध सुरू, २७४ तालिबानी तर ५५ पाकिस्तानी सैन्यांचा मृत्यू
Pakistan Air Strike : पाकिस्तानवर दिवसाढवळ्या एअरस्ट्राइक; अफगाणिस्तानचा लष्कराच्या तळावर हल्ला, बराकी केल्या उद्ध्वस्त

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com