T20 world cup viral video: भारत की पाकिस्तान? वर्ल्डकप कोण जिंकणार? ती स्क्रिप्ट होतेय व्हायरल, तुम्ही पाहिलाय व्हिडिओ?

Is T20 World Cup 2026 scripted viral video: टी20 वर्ल्डकपदरम्यान सोशल मीडियावर संपूर्ण स्पर्धा स्क्रिप्टनुसार खेळवली जात असल्याचा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. भारताच्या सेमीफायनल समीकरणांसोबतच फायनल नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दाव्यामागील सत्य काय?
Is T20 World Cup 2026 scripted viral video
Is T20 World Cup 2026 scripted viral videosaam tv
Published On

आयसीसी मेन्स टी-२० वर्ल्डकप खेळवण्यात येतोय. यामध्ये सध्या टीम इंडिया नेट रन रेटच्या जाळ्यात फसल्याचं दिसून येतंय. दरम्यान एकीकडे टीम इंडिया सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी धडपड करत असताना दुसरीकडे सोशल मीडियावर एका व्हिडिओने मोठी खळबळ उडवलीये.

सोशल मीडियावर काही इन्फ्लुएन्सर्सने पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये संपूर्ण स्पर्धेची स्क्रिप्टआधीच तयार असल्याचा दावा केलाय. या स्क्रिप्टनुसार, सुपर-८ टप्प्यातील सामने, सेमीफायनलची समीकरणं आणि फायनलपर्यंतचा प्रवास स्पष्टपणे सांगण्यात आला आहे. आता या दाव्यामध्ये किती तथ्य आहे ते वर्ल्डकप फायनलच्या सामन्यानंतर समजणार आहे.

Is T20 World Cup 2026 scripted viral video
South Africa vs India : टीम इंडियाचा विजयी 'तिलक'; दणदणीत विजयासह मालिकेत २-१ ने घेतली आघाडी

व्हिडिओमध्ये इन्फ्लुएन्सर सांगतात की, सुपर-८ फेरीमध्ये प्रथम दक्षिण आफ्रिका वेस्ट इंडिजचा पराभव करेल. यानंतर टीम इंडिया झिम्बाब्वेला पराभूत करेल. पुढे भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात नॉकआऊट सामना होईल आणि त्यात भारताचा विजय होईल. त्यामुळे नेट रन रेटचा कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही.

या स्क्रिप्टनुसार पुढे, सेमीफायनलमध्ये भारताचा सामना न्यूझीलंडशी होईल तर दुसऱ्या सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड आमनेसामने येतील. शेवटी फायनलमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांची लढत होईल आणि सुपर-८ मध्ये झालेल्या पराभवाचा बदला भारत घेईल, असंही या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलंय. विशेष म्हणजे हा अंतिम सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर असंही व्हिडिओत नमूद करण्यात आलंय.

Is T20 World Cup 2026 scripted viral video
T20 World Cup : सुपर ८ चं समीकरण ठरलं! ३ संघांना भिडणार भारत, कधी आणि कुठे होणार सामने? संपूर्ण वेळापत्रक

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वेगाने व्हायरल झाला असून हजारो लोकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्यात. काही चाहत्यांनी, 'जर ही स्क्रिप्ट खरी ठरली तर काही खरं नाही असं म्हटलंय. तर अनेकांनी हा दावा खोटा असल्याचं सांगितलं.

Is T20 World Cup 2026 scripted viral video
T20 World Cup: झिम्बाब्वेविरूद्ध भिडण्याआधीच भारताचा सेमीफायनलचा रस्ता ठरणार, वाचा नेमकं समीकरण काय आहे?

क्रिकेट संदर्भातील अशा मोठ्या स्पर्धेंविषयी सोशल मीडियावर बरेच दावे व्हायरल होत असतात. आज भारत विरूद्ध झिम्बाव्बे यांच्यात संध्याकाळी ७ वाजता सामना रंगणार आहे. त्यापूर्वी दक्षिण आफ्रिका विरूद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये पण सामना खेळवण्यात येणार आहे. हा सामना देखील भारतासाठी महत्त्वाचा असल्याचं म्हटलं जातंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com