South Africa vs India : टीम इंडियाचा विजयी 'तिलक'; दणदणीत विजयासह मालिकेत २-१ ने घेतली आघाडी

South Africa vs India cricket match : टीम इंडियाचा शानदार विजय झाला आहे. सामन्यातील विजयासह २-१ ने आघाडी घेतली आहे.
टीम इंडियाचा विजयी'तिलक'; दणदणीत विजयासह मालिकेत २-१ ने घेतली आघाडी
South Africa vs India Saam tv
Published On

नवी दिल्ली : भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये ४ टी -२० सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना स्पोर्ट्स पार्कच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी भारतीय संघाने २० षटक अखेर ६ गडी बाद २१९ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला २०८ धावा करता आल्या. शेवटी भारताने हा सामना सहज जिंकला आहे. यासह मालिकेत २ -१ ने विजयी आघाडी घेतली आहे.

भारतीय संघाने केल्या २१९ धावा

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. भारताने सलग तिसऱ्यांदा नाणेफेक गमावला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला पहिल्याच षटकात मोठा धक्का बसला. संजू सॅमसन शून्यावर बाद होऊन माघारी परतला. त्यानंतर अभिषेक शर्माने तिलक वर्मासोबत मिळून महत्वपूर्ण भागीदारी केली.

टीम इंडियाचा विजयी'तिलक'; दणदणीत विजयासह मालिकेत २-१ ने घेतली आघाडी
Cricket news: 'या' वरिष्ठ खेळाडूकडून निवृत्तीची घोषणा; चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर वनडेला ठोकणार रामराम

अभिषेक शर्माने २५ चेंडूत ५० धावांची खेळी केली. तर तिलक वर्माने आपल्या कारकिर्दीतील पहिलं शतक झळकावत ५६ चेंडूत १०७ धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने ८ चौकार आणि ७ षटकार खेचले. या सामन्यात हार्दिक पंड्याला मोठी खेळी करता आली नाही. तो १८ धावा करत माघारी परतला. आपला पहिलाच सामना खेळत असलेल्या रमनदीप सिंगने पहिल्याच चेंडूवर षटकार खेचत ६ चेंडूत १५ धावांची खेळी केली.

टीम इंडियाचा विजयी'तिलक'; दणदणीत विजयासह मालिकेत २-१ ने घेतली आघाडी
Team India: विराट- रोहितने आता एकच काम करावं..ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाने दिला लाखमोलाचा सल्ला
टीम इंडियाचा विजयी'तिलक'; दणदणीत विजयासह मालिकेत २-१ ने घेतली आघाडी
South Africa vs Nepal : श्वास रोखून धरणारा थरार! शेवटच्या षटकात दक्षिण आफ्रिकेने अवघ्या एका धावेने केली नेपाळवर मात

संजू फ्लॉप तर तिलक वर्माचं शतक

या मालिकेतील पहिल्याच सामन्यात संजू सॅमसनने वादळी खेळी करत शानदार शतक झळकावलं होतं. मात्र पुढील २ सामन्यांमध्ये त्याला हवी तशी कामगिरी करता आली नाही. पुढील दोन्ही सामन्यांमध्ये तो शून्यावर माघारी परतला. तर तिलक वर्माने ५६ चेंडूत ८ चौकार आणि ७ षटकार खेचत १०७ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर त्याने भारतीय संघाचा डाव ६ गडी बाद २१९ धावांवर पोहोचवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com