South Africa vs Nepal : श्वास रोखून धरणारा थरार! शेवटच्या षटकात दक्षिण आफ्रिकेने अवघ्या एका धावेने केली नेपाळवर मात

South Africa vs Nepal T20 World Cup 2024 : दक्षिण आफ्रिका आणि नेपाळमध्ये रोमहर्षक सामना झाला. श्वास रोखून धरणाऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकने नेपाळवर एका धावाने विजय मिळवला.
श्वास रोखून धरणारा थरार! शेवटच्या षटकात दक्षिण आफ्रिकने अवघ्या एका धावाने केली नेपाळवर मात
South Africa vs Nepal Saam tv

मुंबई : टी-२० विश्वचषक स्पर्धेत शनिवारी दक्षिण आफ्रिका आणि नेपाळमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगला. रोमहर्षक सामन्यात दक्षिण आफ्रिकने नेपाळला एका धावेने पराभूत केले. दक्षिण आफ्रिकेने दिलेलं ११६ धावांचं आव्हान पार पडताना नेपाळला नाकीनऊ आले. सामना नेपाळ जिंकेल अशी आशा असताना शेवटच्या षटकात दक्षिण आफ्रिकेने बाजी मारली.

टी-२० विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिका आणि नेपाळमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगला. शेवटच्या षटकात नेपाळला १ चेंडूत २ धावा हव्या होत्या. यावेळी गुलशन झा फलंदाजी करत होता. मात्र, गुलशनला शॉर्ट चेंडूवर मोठा फटका मारता आला नाही. त्यानंतर बॅटर धावा काढण्यासाठी पळाला. यावेळी गुलशना एकच धाव पूर्ण झाला. दुसरी धाव घेताना गुलशन झा धावचित झाला. या सामन्यात नेपाळ अवघ्या एका धावेने पराभूत झाला.

श्वास रोखून धरणारा थरार! शेवटच्या षटकात दक्षिण आफ्रिकने अवघ्या एका धावाने केली नेपाळवर मात
USA ने इतिहास रचला, पहिल्यांदाच टी -२० वर्ल्डकप स्पर्धेच्या सुपर ८ मध्ये प्रवेश; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर

शेवटच्या षटकात नेपाळला ८ धावा पाहिजे होत्या. खेळपट्टीवर गुलशन झा आणि सोमपाल होते. शेवटच्या षटकाची जबाबदारी दक्षिण आफ्रिकेने ओट्टनीलवर दिली होती. या रोमहर्षक सामन्यामुळे प्रेक्षकांनी श्वास रोखून धरला होता. या सामन्यात नेपाळ इतिहास रचणार होती. मात्र, शेवटच्या चेंडूत नेपाळला पराभूताला सामोरे जावं लागलं.

श्वास रोखून धरणारा थरार! शेवटच्या षटकात दक्षिण आफ्रिकने अवघ्या एका धावाने केली नेपाळवर मात
UEFA EURO 2024: केव्हा अन् कुठे रंगणार युएफा युरो २०२४ स्पर्धेचा थरार? इथे पाहा फुकटात

शेवटच्या चेंडूच्या वेळी नेमकं काय झालं?

२० व्या षटकातील शेवटचा शॉट चेंडू गुलशनला खेळता आला नाही. त्यामुळे चेंडू विकेटकीपरकडे गेला. त्यानंतर नेपाळच्या फलंदाजांनी धावा घ्यायला सुरुवात केली. यामुळे विकेटकीपरने गोलंदाजाकडे चेंडू फेकला. त्यानंतर हेनरिक क्सासेनने चेंडू स्टम्पला लावला. त्यामुळे नेपाळने एका धावेने सामना गमावला. अवघ्या एका धावेने सामना गमावल्यानंतर फलंदाज निराश झाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com