फुटबॉल विश्वातील सर्वात मोठी स्पर्धा युएफा युरो लीग स्पर्धेला १५ जूनपासून प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेचे यजमानपद जर्मनीकडे सोपवण्यात आले आहे. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात जर्मनी आणि स्कॉटलंड हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. ३० दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत एकूण ५१ सामने खेळले जाणार आहे. गतवर्षी झालेल्या सामन्यात इटलीने इंग्लंडला धूळ चार जेतेपदाचा मान मिळवला होता. त्यामुळे इटलीचा संघ डिफेंडिग चॅम्पियन म्हणून मैदानात उतरणार आहे. त्यामुळे हा संघ या हंगामात कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
या स्पर्धेतील संघांना ६ गटात विभागलं गेलं आहे. या गटात असलेले प्रत्येकी २-२ संघ पुढच्या फेरीत प्रवेश करतील. यासह ६ गटातून १६ संघ पुढच्या फेरीत जातील.त्यानंतर क्वार्टर फायनल आणि सेमीफायनलचे सामने खेळले जातील. या स्पर्धेत २७ जूनपर्यंत साखळी फेरीतील सामन्यांचा थरार रंगणार आहे. त्यानंतर २९ जूनपासून सुपर १६ फेरीतील सामन्यांना सुरुवात होणार आहे.
भारतीय फुटबॉल फॅन्सला या सामन्यांचा थरार घरबसल्या लाईव्ह पाहता येणार आहे. हे सामने सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहेत. यासह मोबाईलवर हे सामने सोमी लिव अॅपवर पाहता येतील.
ग्रुप ए: हंगेरी, स्वित्जरलँड, जर्मनी , स्कॉटलंड
ग्रुप बी: स्पेन, अल्बानिया, इटली, क्रोएशिया
ग्रुप सी: इंग्लंड, स्लोवेनिया, सर्बिया, डेनमार्क
ग्रुप डी: पोलँड, फ्रान्स, ऑस्ट्रिया ,नेदरलँड
ग्रुप ई: यूक्रेन, बेल्जियम, रोमानिया, स्लोवाकिया
ग्रुप एफ: तुर्की, चेक रिपब्लिक, पोर्तुगल ,जॉर्जिया
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.