PM Modi Italy Visit: PM मोदींचा पहिला विदेश दौरा! आज इटलीला रवाना होणार, जी-७ परिषदेला उपस्थिती; पंतप्रधान जॉर्जिया मेलोडोया यांची भेट घेणार

PM Modi First Foreign Tour: पंतप्रधान पदाचा पदभार स्विकारल्यानंतर नरेंद्र मोदी यांचा पहिला विदेश दौरा निश्चित झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून इटली दौऱ्यावर जाणार आहेत.
PM Modi Italy Visit: PM मोदींचा पहिला विदेश दौरा! आज इटलीला रवाना होणार, जी-७ परिषदेला उपस्थिती; पंतप्रधान जॉर्जिया मेलोडोया यांची भेट घेणार
PM Modi First Foreign Tour:Twitter/ ANI

दिल्ली|१३ जून २०२४

देशाचे नवे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांचा शपथ घेतली. ९ जून रोजी नव्या एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. पंतप्रधान पदाचा पदभार स्विकारल्यानंतर नरेंद्र मोदी यांचा पहिला विदेश दौरा निश्चित झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून इटली दौऱ्यावर जाणार आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांचा पहिला विदेश दौरा ठरला आहे. आजपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी इटली दौऱ्यावर रवाना होतील. G7 शिखर संमेलनासाठी पंतप्रधान मोदी मोदी यांचा हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय दृष्टीने भारताचे त्या देशांसोबत संबंध सुधारण्यासाठी अनेक मुद्यांवर या संमेलनात चर्चा होणार आहे.

आतापर्यंत शिखर संमेलनात भारताने 11 वेळा सहभग नोंदवला आहे तर नरेंद्र मोदी हे सलग 5 वेळा या संमेलनात सहभागी झाले आहेत. मोदी G 7 देशांच्या नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका करण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पंतप्रधान मोदी हे इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोडोया यांच्यासोबत देखील बैठक करणार आहेत.

PM Modi Italy Visit: PM मोदींचा पहिला विदेश दौरा! आज इटलीला रवाना होणार, जी-७ परिषदेला उपस्थिती; पंतप्रधान जॉर्जिया मेलोडोया यांची भेट घेणार
Manoj jarange Patil: खासदार बजरंग सोनवणे पुन्हा मनोज जरांगेंच्या भेटीला, २ तास चर्चा; सर्व खासदारांसोबत राज्यपालांची भेट घेणार

दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्याआधी खलिस्तानवाद्यांनी इटलीमधील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची तोडफोड केल्याचे समोर आले आहे. या दौऱ्यामध्ये पंतप्रधान मोदी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे उद्घाटन करणार होते. या कृत्याने सोशल मीडियावर संताप आणि निषेध व्यक्त केला जात आहे.

PM Modi Italy Visit: PM मोदींचा पहिला विदेश दौरा! आज इटलीला रवाना होणार, जी-७ परिषदेला उपस्थिती; पंतप्रधान जॉर्जिया मेलोडोया यांची भेट घेणार
Maharashtra Weather Forecast: मान्सूनवार्ता! 'या' जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; कसं असेल आजचं हवामान?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com