Manoj jarange Patil: खासदार बजरंग सोनवणे पुन्हा मनोज जरांगेंच्या भेटीला, २ तास चर्चा; सर्व खासदारांसोबत राज्यपालांची भेट घेणार

Manoj Jarange Patil Maratha Aarkshan Latest News: मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केल्या पासून अनेक नवनिर्वाचित खासदार, नेते त्यांची भेट घेऊन पाठिंबा दर्शवmtvत आहेत.
Manoj jarange Patil: खासदार बजरंग सोनवणे पुन्हा मनोज जरांगेंच्या भेटीला, २ तास चर्चा; सर्व खासदारांसोबत राज्यपालांची भेट घेणार
Manoj jarange Patil: Saamtv

अक्षय शिंदे, ता. १३ जून २०२४

सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पुन्हा उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केल्या पासून अनेक नवनिर्वाचित खासदार, नेते त्यांची भेट घेऊन पाठिंबा दर्शवत आहेत. अशातच बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी काल रात्री दुसऱ्यांदा जरांगे यांची भेट घेतली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बीडचे नवनिर्वाचित खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते बजरंग सोनवणे यांनी रात्री उशिरा अंतरवाली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी खासदार सोनवणे यांनी जरांगे पाटील यांच्या तब्बेतीची विचारपूस केली तसेच यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्याशी त्यांनी तब्बल दोन तास चर्चा केली.

तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांसंदर्भात महाराष्ट्रातील सगळ्या खासदारांना एकत्र करून राज्यपालांना भेटणार असल्याचेही बजरंग सोनवणे यांनी यावेळी सांगितले. तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या जीआर काढून पुर्ण कराव्यात, अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली.

Manoj jarange Patil: खासदार बजरंग सोनवणे पुन्हा मनोज जरांगेंच्या भेटीला, २ तास चर्चा; सर्व खासदारांसोबत राज्यपालांची भेट घेणार
Maharashtra Weather Forecast: मान्सूनवार्ता! 'या' जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; कसं असेल आजचं हवामान?

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस असून त्यांची प्रकृती खालावत असल्याचे दिसत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीमुळे मराठा बांधव पुन्हा एकदा आक्रमक झाला असून काल सोलापूर तसेच जालन्यात रास्ता रोको करण्यात आला होता.

Manoj jarange Patil: खासदार बजरंग सोनवणे पुन्हा मनोज जरांगेंच्या भेटीला, २ तास चर्चा; सर्व खासदारांसोबत राज्यपालांची भेट घेणार
Maharashtra Politics 2024: महायुतीतून लढणार, 20 जागा मिळणार?; मनसे आदित्य ठाकरेंना वरळीत आव्हान देणार?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com