Maharashtra Politics 2024: महायुतीतून लढणार, 20 जागा मिळणार?; मनसे आदित्य ठाकरेंना वरळीत आव्हान देणार?

Raj Thackeray/MNS May Contest in Assembly Election 2024 From Worli: महाराष्ट्र नवनिर्माण सेना आगामी विधानसभा निवडणूक महायुतीतून लढण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंनी महायुतीकडे २० जागांचा आग्रह धरल्याची सूत्रांची माहिती आहे.
Maharashtra Politics 2024: महायुतीतून लढणार, 20 जागा मिळणार?; मनसे आदित्य ठाकरेंना वरळीत आव्हान देणार?
Raj ThackeraySaam Digital

गिरीश निकम, साम टीव्ही प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. मनसेही विधानसभेच्या तयारी लागली असून 20 जागांसाठी आग्रह धरल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्यामुळे महायुतीला जागावाटपाची मोठी कसरत करावी लागणारेय. मनसेनं कोणत्या जागांवर दावा सांगितलाय आणि महायुतीची कशी डोकेदुखी वाढणार आहे त्यावरचा हा रिपोर्ट.

लोकसभेचा धुराळा शांत झाल्यावर आता विधानसभेसाठी सर्व पक्ष सज्ज झाले आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलेली मनसे विधासभेसाठी मात्र ताकदीनीशी मैदानात उतरणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी संभाव्य जागावाटपाबाबत भाजपशी बोलणी सुरू केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मनसेने राज्यात विधानसभेच्या 20 जागांची मागणी केली आहे. मनसेने दावा केलेल्या बहुतांश जागा मुंबई आणि परीसर, तसंच पुणे आणि नाशिकमधल्या आहेत. यामध्ये वरळी, माहीम, शिवडी, मागाठाणे, दिंडोशी, जोगेश्वरी, वर्सोवा, घाटकोपर पश्चिम, चेंबूर, ठाणे, भिवंडी ग्रामीण, कल्याण ग्रामीण, नाशिक पूर्व, वणी, पंढरपूर, संभाजीनगर मध्य आणि पुण्यातील काही जागांचा समावेश आहे.

मनसेच्या कोणत्या नेत्यांना मिळू शकते उमेदवारी?

विशेष म्हणजे वरळीत आदित्य ठाकरे यांच्या विरोधात संदीप देशपांडे यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. माजी आमदार नितीन सरदेसाई माहीममधून तर शालिनी ठाकरे वर्सोव्यातून निवडणूक लढवू शकतात. मनसेचे एकमेव विद्यमान आमदार राजू पाटील कल्याण ग्रामीणमधून रिंगणात असतील. त्याशिवाय शिवडी किंवा नाशिक परिसरातून बाळा नांदगावकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला आहे. भाजपच्या जागा 23 वरून 9 वर आल्या. राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा देऊनही फायदा झाला नाही.

विधानसभा निवडणुकीत मनसेला महायुतीसोबत घेतलं तर त्यांना जागा द्याव्या लागणार आहेत. त्यामुळे विधानसभेत जागावाटपाबाबत लोकसभेपेक्षा जास्त डोकेदुखी असणार आहे. त्यामुळे महायुतीला मनसेचा फायदा होणार की बंडखोरांना सामोरं जावं लागणार याचीच उत्सुकता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com