PM Modi: लोकसभेतील विजयाबद्दल मोदींचं जगभरातून कौतुक; इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी काय म्हणाल्या?

Italy President Giorgia Meloni Congratulate PM Modi: लोकसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतर इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान मोदींचं अभिनंदन केलं आहे. यंदा लोकसभेत एनडीएने २९० पेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत.
जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान मोदींचं अभिनंदन केलं
Giorgia Meloni Congratulate PM ModiSaam Tv

लोकसभा निवडणूक २०२४ चा निकाल काल जाहीर झालाय. यंदा एनडीएला लोकसभेत २९० पेक्षा जास्त जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे केंद्रात सलग तिसऱ्यांदा एनडीएचे सरकार स्थापन होणार असल्याचं चित्र आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींचं जगभरातील राष्ट्रप्रमुखांनी अभिनंदन केलं आहे. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे, श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांनी X वर पोस्ट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (Giorgia Meloni) यांनी पंतप्रधान मोदींचं अभिनंदन केलं आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर नवीन निवडणुकीच्या विजयासाठी आणि चांगल्या कामासाठी शुभेच्छा, अशी पोस्ट केली (Lok Sabha Election Result 2024) आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटलंय की, इटली आणि भारत यांना एकत्र आणणारी मैत्री आणि आपल्या राष्ट्रांच्या आणि लोकांच्या कल्याणाशी संबंधित मुद्द्यांवर आम्ही एकत्र काम करत राहू, असं म्हणत त्यांनी PM मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत .

मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिलंय की, २०२४ च्या निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा यशस्वी झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप (PM Modi) आणि एनडीएचे अभिनंदन. दोन्ही देशांच्या सामायिक समृद्धीसाठी मी एकत्र काम करण्यास उत्सुक असल्याचे मुइज्जु यांनी म्हटलं आहे.

भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे म्हणाले आहेत की, ते भारतासोबतचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी उत्सुक आहेत. जगातील सर्वात मोठ्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्याबद्दल माझे मित्र पंतप्रधान मोदी आणि एनडीएचे अभिनंदन, अशी पोस्ट त्यांनी X वर केली आहे. मोदी भारताला नव्या उंचीवर नेत असल्याचं त्यांनी (BJP) म्हटलंय. आपल्या दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी काम करण्यास उत्सुक असल्याचं देखील भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे म्हणाले आहेत.

जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान मोदींचं अभिनंदन केलं
Narendra Modi Varanasi : वाराणसीत 'फिर एक बार' मोदी खासदार; तरीही काँग्रेसच्या उमेदवाराने मिळवली इतकी मते

श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांनीही मोदींचं अभिनंदन केलं आहे. त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, एनडीएच्या विजयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनतेचा प्रगती आणि समृद्धीवर विश्वास दाखवला आहे. श्रीलंका, आपला सर्वात जवळचा शेजारी असल्याने, भारतासोबतची भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी उत्सुक असल्याचं विक्रमसिंघे यांनी म्हटलं आहे.

जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान मोदींचं अभिनंदन केलं
PM Modi Speech: देशाच्या इतिहासातील अविश्वसनीय क्षण; NDA तिसऱ्यांदा बनवणार सरकार , मोदींचा मोठा दावा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com