Narendra Modi Varanasi : वाराणसीत 'फिर एक बार' मोदी खासदार; तरीही काँग्रेसच्या उमेदवाराने मिळवली इतकी मते

Narendra Modi Varanasi lok sabha Election: वाराणसीतून नरेंद्र मोदी मोठ्या मताधिक्याने विजयी झालेत. नरेंद्र मोदी यांनी 1.52 लाख मतांनी विजय मिळवलाय.
Narendra Modi Varanasi : वाराणसीत 'फिर एक बार' मोदी खासदार; तरीही काँग्रेसच्या उमेदवाराने मिळवली इतकी मते
financial Express

उत्तर प्रदेशातील वाराणसीत पीएम मोदी विजयी झालेत. नरेंद्र मोदी यांनी 1.52 लाख मतांनी विजय मिळवलाय. उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या 80 जागांसाठी आज सकाळपासून मतमोजणी सुरू झाली. दुपारी 4.15 वाजेपर्यंतच्या ट्रेंडनुसार भाजप 35 जागांवर, सपा 34, काँग्रेस 07, आरएलडी 02, आझाद समाज पक्ष 01 आणि अपना दल एस 01 जागांवर आघाडीवर आहे. तर येथील वाराणसीच्या मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला असून येथे नरेंद्र मोदी पुन्हा एकदा विजयी झालेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे उमेदवार अजय राय यांचा दीड लाख मतांनी पराभव केला. मोदींचा विजय जरी झाला तरी त्यांच्या मताधिक्यात मोठी घट झालीय. गेल्या निवडणुकीत मिळालेल्या मतांपेक्षा यावेळी मोदींना कमी मते मिळालीत. मागील निवडणुकीत पंतप्रधान मोदींना ६ लाख ७४ हजार ६६४ मते मिळाली होती. या निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांना ६ लाख ११ हजार ४३९ मते मिळू शकली. तर गेल्या वेळी केवळ एक लाख ५२ हजार ५४८ मते मिळवणारे काँग्रेसचे उमेदवार अजय राय यांना यावेळी ४ लाख ५९ हजार ०८४ मते मिळालीत. पीएम मोदींनी अजय राय यांचा 1१लाख ५२ हजार ३५५ मतांनी पराभव केला.

दरम्यान मंगळवारी सकाळी मतमोजणी सुरू झाली तेव्हा एका क्षणी पंतप्रधान मोदी यांना अजय राय यांनी पिछाडीवर टाकले. पोस्टल बॅलेटच्या मतमोजणीत अजय राय यांनी पंतप्रधान मोदींवर ६००० मतांची आघाडी घेतली होती. त्यानंतर ईव्हीएममधील मतमोजणी सुरू झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी आघाडी घेण्यास सुरुवात केली. मागील दोन लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांनी वाराणसीतून एकतर्फी विजय मिळवला. २०१९ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींना ६ लाख ७४ हजार ६६४ मते मिळाली होती.

Narendra Modi Varanasi : वाराणसीत 'फिर एक बार' मोदी खासदार; तरीही काँग्रेसच्या उमेदवाराने मिळवली इतकी मते
PM Modi Interview: पंतप्रधान मोदी पत्रकार परिषद का घेत नाहीत? स्वत: मोदींनीच केला खुलासा

समाजवादी पक्षाच्या उमेदवार शालिनी यादव यांना १ लाख ९५ हजार १५९ मते मिळाली. काँग्रेसचे अजय राय यांना १ लाख ५२ हजार ५४८ मते मिळाली. २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाराणसीमध्ये ५ लाख ८१ हजार मते मिळाली होती. त्यांनी अरविंद केजरीवाल यांचा २ लाख ९ हजार मतांनी पराभव केला. काँग्रेससह अन्य पक्षांच्या एकाही उमेदवाराला एक लाख मतेही मिळवता आली नाहीत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com