Rahul Gandhi: ४ जूननंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान राहणार नाहीत, 'त्या' फेक व्हिडीओवर राहुल गांधींनी केलं खरं-खोटं

Rahul Gandhi On PM Narendra Modi: राहुल गांधी यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. उत्तर प्रदेशमध्ये केलेल्या भाषणाचा त्यांचा हा व्हिडीओ आहे. भाजपने त्याचा हा व्हिडीओ एडीट करत सोशल मीडियावर पोस्ट केला होता.
Rahul Gandhi On PM Narendra Modi
Rahul Gandhi On PM Narendra ModiSaam TV

भाजपकडून (BJP) सोशल मीडियावर व्हायरल केला जाणाऱ्या व्हिडीओवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) चांगलेच संतप्त झाले आहेत. एडिट केलेला राहुल गांधी यांचा व्हिडीओ भाजपच्या काही नेत्यांकडून सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे. राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर खोटा आणि खरा असे दोन्ही व्हिडीओ शेअर करत भाजपवर निशाणा साधला आहे. या पोस्टद्वारे त्यांनी '४ जूननंतर नरेंद्र मोदी (Narendra Modi) पंतप्रधान राहणार नाही.', असे खडसावून सांगितले आहे.

राहुल गांधी यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. उत्तर प्रदेशमध्ये केलेल्या भाषणाचा त्यांचा हा व्हिडीओ आहे. भाजपने त्याचा हा व्हिडीओ एडीट करत सोशल मीडियावर पोस्ट केला होता. पण राहुल गांधी जे बोलले नाही ते या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आले होते. अशामध्ये राहुल गांधी यांनी पोस्टद्वारे सत्यता समोर आणली आहे. राहुल गांधी यांनी भाजपने एडीट केलेला व्हिडीओ आणि त्यांचा खरा व्हिडीओ असा टू विंडोमध्ये व्हिडीओ शेअर केला आहे.

राहुल गांधी यांनी या पोस्टद्वारे भाजपला 'झूठ की फॅक्ट्री' असे म्हटले आहे. त्यांनी या एक्स पोस्टमध्ये असे लिहिले की, 'झूठ की फॅक्ट्री' भाजपने कितीही दिलासा दिला तरी फरक पडणार नाही. मी पुन्हा एकदा सांगतो की, नरेंद्र मोदी 4 जूननंतर पंतप्रधान राहणार नाहीत. देशाच्या कानाकोपऱ्यात INDIA चे वादळ वाहू लागले आहे.' काँग्रेस पक्षाने देखील आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करत लिहिले की, 'बुडत चाललेल्या भाजप आणि नरेंद्र मोदींच्या फेक न्यूज फॅक्टरीला आता फक्त फेक व्हिडीओजचा आधार आहे. सवयीप्रमाणे राहुल गांधींचे भाषण एडिट करून खोटा व्हिडिओ बनवला गेला आणि आता त्यांना रंगेहाथ पकडले गेले.' काँग्रेसने पोस्ट केलेला राहुल गांधींचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Rahul Gandhi On PM Narendra Modi
PM Modi Roadshow in Ghatkopar: PM मोदींचा मुंबईत रोड शो, ड्रोन- पंतग आणि फुगे उडवण्यास बंदी

काँग्रेसने पोस्ट केलेल्या खोट्या आणि खऱ्या व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत. भाजपने पोस्ट केलेल्या राहुल गांधी यांच्या व्हिडीओमध्ये ते बोलतात की, 'सुरूवातीलाच मी तुम्हाला सांगतो की ही गोष्ट खरी आहे की ४ जून २०२४ ला नरेंद्र मोदी हिंदुस्थानचे पंतप्रधान होणार.' पण राहुल गांधींच्या खऱ्या व्हिडीओमध्ये ते, '४ जून २०२४ ला नरेंद्र मोदी हिंदुस्थानचे पंतप्रधान राहणार नाही.' असे म्हणताना दिसतात. तसंच, 'तुम्ही लिहून घ्या की नरेंद्र मोदी हिंदुस्तानचे पंतप्रधान बनू शकतात.' तर राहुल गांधींच्या खऱ्या व्हिडीओमध्ये ते म्हणतात, 'तुम्ही लिहून घ्या की नरेंद्र मोदी हिंदुस्तानचे पंतप्रधान बनू शकत नाही.'

Rahul Gandhi On PM Narendra Modi
Rahul Gandhi: लग्न कधी करणार? कार्यकर्त्यांनी राहुल गांधींना विचारला प्रश्न; सांगितली 'मन की बात'

भाजपच्या व्हिडीओमध्ये राहुल गांधी म्हणतात की, 'आम्हाला जे काम आणि मेहनत करायची होती ती आम्ही केली आहे.आता तुम्ही पाहा उत्तर प्रदेशमध्ये आमच्या आघाडीला एकही सीट नाही मिळणार.' राहुल गांधींच्या खऱ्या व्हिडीओमध्ये ते म्हणतात की, 'आम्हाला जे काम आणि मेहनत करायची होती ती आम्ही केली आहे. आता तुम्ही पाहा उत्तर प्रदेशमध्ये आमच्या आघाडीला ५० पेक्षा कमी सीट मिळणार आहे.' तसंच, 'सर्वांना माहिती आहे की राहुल गांधी जे बोलत आहे ते खरं आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान बनणार आहेत गोष्ट संपली.' तर राहुल गांधींच्या खऱ्या व्हिडीओत ते म्हणतात की, 'सर्वांना माहिती आहे की राहुल गांधी जे बोलत आहे ते खरं आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान बनणार नाहीत गोष्ट संपली.'

Rahul Gandhi On PM Narendra Modi
Ghatkopar Hoarding Accident: होर्डिंग कोसळून अनेकांचा बळी, त्याच घाटकोपरमध्ये PM मोदींचा रोड शो; संजय राऊतांची टीका

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com