Rahul Gandhi: लग्न कधी करणार? कार्यकर्त्यांनी राहुल गांधींना विचारला प्रश्न; सांगितली 'मन की बात'

Rahul Gandhi On Marriage: या प्रचार सभेनंतर राहुल गांधी यांना कार्यकर्त्यांनी ते लग्न कधी करणार? हा प्रश्न विचारला. कार्यकर्त्यांना पडलेल्या या प्रश्नावर उत्तर देताना राहुल गांधी यांनी त्यांच्या मनातील गोष्ट सांगितली.
Rahul Gandhi
Rahul Gandhi SAAM TV

काँग्रेसचे (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) कधी लग्न करणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. आता तुम्हाला पडलेल्या या प्रश्नाचे उत्तर स्वत:राहुल गांधी यांनी दिले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायबरेली येथे राहुल गांधी यांची प्रचार सभा झाली. या प्रचार सभेनंतर राहुल गांधी यांना कार्यकर्त्यांनी ते लग्न कधी करणार? हा प्रश्न विचारला. कार्यकर्त्यांना पडलेल्या या प्रश्नावर उत्तर देताना राहुल गांधी यांनी त्यांच्या मनातील गोष्ट सांगितली.

रायबरेली येथील प्रचारसभा संपल्यानंतर कार्यकर्त्यांनी गर्दी करत राहुल गांधींना लग्न कधी करणार? हा प्रश्न विचारला. गर्दीतून येणारा आवाज ऐकताच राहुल गांधी त्यांच्या बाजूला उभ्या राहिलेल्या लोकांना ते काय बोलत आहेत असे विचारले. तर यावर एकाने लग्न कधी करणार? असा प्रश्न विचारत असल्याचे सांगितले. यावर उत्तर देताना राहुल गांधी यांनी 'आता लवकरच लग्न करावे लागेल.', असे सांगितले.

Rahul Gandhi
Pune Loksabha News : '...अन्यथा शिक्षा व्हायला हवी'; मतदान न करणाऱ्यांवर सुबोध भावे भडकला

राहुल गांधी यावेळी दोन लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. केरळच्या वायनाडमधून ते निवडणूक लढवत आहेत. त्याचसोबत ते उत्तर प्रदेशच्या रायबरेलीमधून देखील निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले आहेत. रायबरेलीमध्ये २० मे रोजी मतदान होणार आहे. या मतदारसंघामध्ये सध्या राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या जोरदार प्रचारसभा होत आहे.

Rahul Gandhi
Mumbai Pune Express Way: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील प्रवाशांसाठी खूशखबर; वाहतूक कोंडी टाळण्यासाठी MSRDCने घेतला मोठा निर्णय

राहुल गांधी यांच्यासोबत प्रियांका गांधी देखील या लोकसभा मतदारसंघामध्ये जिंकून यावे यासाठी पूर्णपणे प्रयत्न करत आहे. या मतदारसंघामध्ये भाजपने आणि काँग्रेसने आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. प्रियांका गांधी यांनी रायबरेलीसाठी विशेष अभियान सुरू केले आहे. त्या एका दिवसात १६ गावांचा दौरा करत आहेत. येत्या १७ मे रोजी रायबरेलीमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांची एकत्र सभा होणार आहे.

Rahul Gandhi
Badlapur - Dombivli Rain: बदलापूर- डोंबिवलीत वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस, VIDEO मधून बघा पावसाचं रौद्ररूप

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com