IND vs USA: टीम इंडियाला एक्स्ट्रा ५ धावा का मिळाल्या? अमेरिकेला ही एक चूक महागात पडली

India vs USA, Stop Clock Rule Penalty Runs: या सामन्यात भारतीय संघाला ५ अतिरिक्त धावा दिल्या गेल्या. काय आहे यामागचं कारण? जाणून घ्या.
IND vs USA: टीम इंडियाला एक्स्ट्रा ५ धावा का मिळाल्या? अमेरिकेला ही एक चूक महागात पडली
team indiatwitter
Published On

भारत आणि अमेरिका या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात भारतीय संघाला अतिरिक्त ५ धावा दिल्या गेल्या. ज्यावेळी अंपायरने ५ धावांचा इशारा केला त्यावेळी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. क्रिकेट चाहतेही गोंधळून गेले की, या ५ धावा का दिल्या गेल्या. आयसीसीचा नवा नियम यामागचं प्रमुख कारण आहे.

ही घटना भारतीय संघाची फलंदाजी सुरु असताना १६ व्या षटकात ठरली. १५ षटक झाल्यानंतर भारतीय संघाने ३ गडी बाद ७६ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यावेळी भारतीय संघाला विजय मिळवण्यासाठी ५ षटकात ३५ धावा करायच्या होत्या. जसदीप सिंग गोलंदाजीला आलाच होता. मात्र तो षटकातील पहिला चेंडू टाकण्यापूर्वीच भारतीय संघाला ५ धावा पेनल्टी स्वरुपात दिल्या गेल्या. यामागचं कारण म्हणजे, स्टॉप क्लॉक नियम.

IND vs USA: टीम इंडियाला एक्स्ट्रा ५ धावा का मिळाल्या? अमेरिकेला ही एक चूक महागात पडली
Rohit Sharma: रोहितने या खेळाडूला दिलं टीम इंडियाच्या विजयाचं श्रेय; सामन्यानंतर काय म्हणाला?

आयसीसीने टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत नवीन नियम लागू केला आहे. या नव्या नियमानुसार, प्रत्येक षटक सुरु करण्यासाठी १ मिनिटांचा अवधी दिला जातो. मात्र पहिल्यांदा किंवा दुसऱ्यांदा षटक सुरु करण्यासाठी उशीर केल्यास अंपायरकडून कर्णधाराला वॉर्निंग दिली जाते. मात्र तिसऱ्यांदा चूक घडल्यास अंपायर फलंदाजी करणाऱ्या संघाला पेनल्टी स्वरुपात ५ धावा देतात.

IND vs USA: टीम इंडियाला एक्स्ट्रा ५ धावा का मिळाल्या? अमेरिकेला ही एक चूक महागात पडली
IND vs USA T20 World Cup: अमेरिकेला नमवत टीम इंडियाची सुपर ८ मध्ये धडक, ७ विकेट राखून दणदणीत विजय

अमेरिकेकडूनही षटक सुरु करण्यात उशीर होत होता. त्यामुळे अंपायरने पेनल्टी म्हणून ५ धावा दिल्या. यासह या नियामामुळे दंड आकारला जाणारा अमेरिकेचा संघ हा पहिलाच संघ ठरला आहे. भारतीय संघाला ५ अतिरिक्त धावा दिल्यानंतर अमेरिकेचे खेळाडू अंपायरशी चर्चा करताना दिसून आले होते.

भारतीय संघाचा विजय

या सामन्यात अमेरिकेचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरला होता. अमेरिकेने प्रथम फलंदाजी करताना ११० धावा केल्या. भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी १११ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून सूर्यकुमार यादवने अर्धशतकी खेळी केली. तर शिवम दुबेनेही महत्वपूर्ण खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com