ICC Prize Money: कोणताच संघ रिकाम्या हाती जाणार नाही! ICC कडून रेकॉर्ड ब्रेकिंग प्राईज मनीची घोषणा

Prize Money For ICC T20 World Cup: आयसीसीने टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी प्राईज मनीची घोषणा केली आहे.
ICC Prize Money: कोणताच संघ रिकाम्या हाती जाणार नाही! ICC कडून रेकॉर्ड ब्रेकिंग प्राईज मनीची घोषणा
rohit sharma chris gayletwitter
Published On

आयसीसीने आगामी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी प्राईज मनीची घोषणा केली आहे. यावेळी आयसीसीचा बजेट ९३.५१ कोटी रुपये इतका असणार आहे. ही एक विक्रमी रक्कम असून, यापूर्वी कधीच इतकी रक्कम ठेवण्यात आली नव्हती. भारतात पार पडलेल्या वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेसाठी ८२.९३ कोटी इतकी प्राईज मनी ठेवण्यात आली होती.

कोणाला किती रक्कम मिळणार?

आयसीसीने सोमवारी( ३ जून) या विक्रमी रकमेची घोषणा केली आहे. यानुसार विजेत्या संघाला २०.३६ कोटी रुपये दिले जाणार आहेत. तर उपविजेत्या संघाला १०.६४ कोटी रुपये दिले जाणार आहेत. यासह सेमीफायनलमध्ये पराभूत होणाऱ्या संघांना ६.५४ कोटी रुपये दिले जाणार आहेत. यापूर्वी आयसीसीच्या कुठल्याच स्पर्धेत इतकी मोठी रक्कम दिली गेली नव्हती. यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे, यावेळी २० संघ टी -२० वर्ल्डकप खेळण्यासाठी मैदानात उतरले आहेत.

ICC Prize Money: कोणताच संघ रिकाम्या हाती जाणार नाही! ICC कडून रेकॉर्ड ब्रेकिंग प्राईज मनीची घोषणा
IND vs PAK: 'भीती तर वाटणारच ना..', भारत- पाकिस्तान सामन्याआधीच बाबर आझम टेन्शनमध्ये

ही रक्कम केवळ विजेत्या किंवा उपविजेत्या संघांना नाही, तर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघांमध्ये विभागली जाणार आहे. सुपर ८ मध्ये प्रवेश करणाऱ्या संघांना प्रत्येकी ३.८ कोटी रुपये दिले जाणार आहेत. तर ९ ते १२ व्या स्थानी असणाऱ्या संघांना २.५ कोटी, १३ ते २० स्थानावर असणाऱ्या संघांना १.८७ कोटी रुपये दिले जाणार आहेत. यासह प्रत्येक सामना जिंकणाऱ्या संघांना प्रत्येकी २५.८९ लाख रुपये दिले जाणार आहेत.

ICC Prize Money: कोणताच संघ रिकाम्या हाती जाणार नाही! ICC कडून रेकॉर्ड ब्रेकिंग प्राईज मनीची घोषणा
IND vs PAK, T20 World Cup: भारत- पाकिस्तान सामना रद्द होणार? या एका नियमामुळे वाढलं टीम इंडियाचं टेन्शन

आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेला २ जूनपासून सुरुवात झाली आहे. भारतीय संघाचा पहिला सामना ५ जून रोजी आयर्लंडविरुद्ध होणार आहे. ९ जून रोजी भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमने सामने असणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com