न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि अमेरिका हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारतीय संघाने दमदार प्रदर्शन करत ७ गडी राखून विजय मिळवला आहे. सामन्यात प्रथम गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने अमेरिकेला ११० धावांवर रोखलं. त्यानंतर १८.२ षटकात हे आव्हान पूर्ण करत विजयाला गवसणी घातली. या सामन्यात ४ गडी बाद करणारा अर्शदीप सिंग सामनावीर ठरला. तर सूर्यकुमार यादवने देखील टीचून फलंदाजी करत अर्धशतकी खेळी केली.
अमेरिकेला पराभूत करत भारतीय संघाने टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील सुपर ८ मध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान सामना झाल्यानंतर रोहितने अर्शदीप सिंगचं कौतुक केलं आहे. तो म्हणाला की, ' अर्शदीप सिंगने शानदार गोलंदाजी केली. आम्हाला गोलंदाजीतील पर्याय पाहायचे होते. त्यामुळे आज शिवम दुबेने देखील गोलंदाजी केली. सुपर ८ मध्ये पोहोचणं दिलासा देणारं आहे. मात्र या मैदानावर खेळणं मुळीच सोपं नव्हतं. या मैदानावर सामना कुठल्याही संघाच्या दिशेने फिरू शकत होता.'
भारतीय संघाकडून प्रथम गोलंदाजी करताना अर्शदीप सिंगने अमेरिकेच्या ४ फलंदाजांना पॅव्हेलियनची वाट दाखवली. भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी केवळ १११ धावा करायच्या होत्या. मात्र हे आव्हान मुळीच सोपं नव्हतं. कारण चेंडू कधी उसळी घेत होता तर कधी खाली राहत होता. भारताला सुरुवातीला २ मोठे धक्के बसले. विराट कोहली पहिल्याच चेंडूवर बाद होऊन माघारी परतला. त्या पाठोपाठ रोहित शर्माने देखील पॅव्हेलियनची वाट धरली. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबेने मिळून डाव सावरला. दोघांनी मिळून अर्धशतकी भागीदारी केली आणि भारतीय संघाला ७ गडी राखून विजय मिळवून दिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.