Team India Playing XI: USA विरुद्धच्या लढतीत रोहित या दोघांना देणार संधी? अशी असू शकते प्लेइंग ११

Team India Playing XI Against USA: भारतीय संघाचा पुढील सामना अमेरिकेविरुद्ध होणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी कशी असेल भारतीय संघाची प्लेइंग ११? जाणून घ्या...
Team India Playing XI: USA विरुद्धच्या लढतीत रोहित या दोघांना देणार संधी? अशी असू शकते प्लेइंग ११
team india twitter
Published On

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत भारतीय संघाने जोरदार सुरुवात केली आहे. पहिल्या सामन्यात भारतीय संघाने आयर्लंडला हरवलं. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा ६ धावांनी धुव्वा उडवला. सलग २ सामने जिंकल्यानंतर भारतीय संघ तिसऱ्या लढतीत अमेरिकेचा सामना करताना दिसून येणार आहे. या सामन्यात विजय मिळवताच भारतीय संघाला सुपर ८ चं तिकीट मिळणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी कशी असेल भारतीय संघाची प्लेइंग ११? जाणून घ्या.

या स्पर्धेतील सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये कुलदीप यादव आणि यशस्वी जयस्वालला संधी देण्यात आलेली नाही. आयपीएल २०२४ स्पर्धेत त्याने जोरदार कामगिरी केली होती. मात्र सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये त्याला खेळण्याची संधी देण्यात आलेली नाही. यासह यशस्वी जयस्वालला देखील प्लेइंग ११ मध्ये स्थान देण्यात आलेलं नाही. सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानावर उतरले होते. अमेरिकेविरुद्ध होणाऱ्या सामन्यात रोहित शर्मा आपला प्लान बदलणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Team India Playing XI: USA विरुद्धच्या लढतीत रोहित या दोघांना देणार संधी? अशी असू शकते प्लेइंग ११
IND vs PAK: रिझवानचा जीव थोडक्यात बचावला; सिराजच्या त्या बॉलवर नेमकं काय घडलं? - Video

केवळ यशस्वी जयस्वाल आणि कुलदीप यादवच नव्हे, तर युजवेंद्र चहल आणि संजू सॅमसनला देखील प्लेइंग ११ मध्ये खेळण्याची संधी देण्यात आलेली नाही. चहलने आयपीएल २०२४ स्पर्धा गाजवली आहे. तर संजू सॅमसनने देखील धावांचा पाऊस पाडला आहे. ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वी झालेल्या सराव सामन्यात संजू सॅमसनला खेळण्याची संधी दिली गेली होती. मात्र या सामन्यात त्याला मोठी खेळी करता आली नव्हती. भारतीय संघाचे पुढील सामने अमेरिका आणि कॅनडाविरुद्ध होणार आहेत.

Team India Playing XI: USA विरुद्धच्या लढतीत रोहित या दोघांना देणार संधी? अशी असू शकते प्लेइंग ११
IND vs PAK: 'त्याला बॅटींग तरी येते का?', पाकिस्तानच्या सुमार कामगिरीनंतर दिग्गज खेळाडू भडकले

सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांसाठी अशी होती भारतीय संघाची प्लेइंग ११:

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, रिषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग

या स्पर्धेसाठी असा आहे भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com