IND vs PAK: रिझवानचा जीव थोडक्यात बचावला; सिराजच्या त्या बॉलवर नेमकं काय घडलं? - Video

Mohammed Siraj- Mohammad Rizwan: भारत आणि पाकिस्तान सामन्यादरम्यान मोहम्मद सिराजच्या बॉलवर मोहम्मद रिझवान थोडक्यात बचावला.
IND vs PAK: रिझवानचा जीव थोडक्यात बचावला; सिराजच्या त्या बॉलवर नेमकं काय घडलं? - Video
mohammad rizwan with mohammed sirajtwitter
Published On

न्यूयॉर्कच्या नासाऊ कांऊटी क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पार पडली. या लढतीत भारतीय संघ नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानावर आला होता. नसीम शाह आणि हारिस रऊफच्या भेदक भाऱ्यासमोर भारतीय संघाचा संपूर्ण डाव ११९ धावांवर आटोपला. त्यानंतर पाकिस्तानचा संघ फलंदाजीला आला त्यावेळी असं काही घडलं, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

तर झाले असे की, पाकिस्तान संघाची फलंदाजी सुरु होती. त्यावेळी दुसरे षटक टाकण्यासाठी मोहम्मद सिराज गोलंदाजीला आला. या त्यावेळी मोहम्मद रिझवान फलंदाजी करत होता. सिराजने टाकलेल्या चेंडूवर रिझवानने समोरच्या दिशेने शॉट मारला. हा चेंडू सिराजच्या हातात गेला. त्यावेळी सिराजने चेंडू यष्टीच्या दिशेने फेकला. मात्र तो चेंडू यष्टीला जाऊन न लागता थेट रिझवानच्या हाताला जाऊन लागला.

IND vs PAK: रिझवानचा जीव थोडक्यात बचावला; सिराजच्या त्या बॉलवर नेमकं काय घडलं? - Video
IND vs PAK: दारुण पराभवानंतर बाबर आझमला राग अनावर! या खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर

चेंडू लागताच तो वेदनेने कळवळताना दिसून आला. मात्र त्यानंतर मोहम्मद सिराजने मोहम्मद रिझवानची माफी मागितली. मोहम्मद सिराजने सुरुवातीपासूनत पाकिस्तानचा डाव सांभाळून ठेवला होता. तो संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जात होता. मात्र १५ व्या षटकात जसप्रीत बुमराहने त्याला बाद करत माघारी. त्याने या डावात ४४ चेंडूंचा सामना करत ३१ धावांची खेळी केली.

IND vs PAK: रिझवानचा जीव थोडक्यात बचावला; सिराजच्या त्या बॉलवर नेमकं काय घडलं? - Video
IND vs PAK: पाकिस्तानच्या पराभवानंतर नसीम शाहला अश्रू अनावर! ढसाढसा रडतानाचा Video व्हायरल

भारतीय संघाचा विजय

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक गमावला. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाचा डाव ११९ धावांवर आटोपला. भारतीय संघाकडून रिषभ पंतने सर्वाधिक ४२ धावांची खेळी केली. तर अक्षर पटेलने २० धावा केल्या. पाकिस्तानला हा सामना जिंकण्यासाठी १२० धावा करायच्या होत्या. मात्र भारतीय गोलंदाजांच्या शानदार गोलंदाजीसमोर पाकिस्तानचा डाव ११३ धावांवर आटोपला. हा सामना भारतीय संघाने ६ धावांनी आपल्या नावावर केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com