IND vs PAK: दारुण पराभवानंतर बाबर आझमला राग अनावर! या खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर

India vs Pakistan, Babar Azam Statement: भारतीय संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान या पराभवानंतर बाबर आझमने पराभवाचं कारण सांगितलं आहे.
IND vs PAK: दारुण पराभवानंतर बाबर आझमला राग अनावर! या खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर
babar azamgoogle

भारत विरुद्ध पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात भारतीय संघाने शानदार विजय मिळवला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला २० षटक अखेर अवघ्या ११९ धावा करता आल्या. इथून भारतीय संघाचा पराभव निश्चित दिसत होता.

मात्र गोलंदाजांनी भारतीय संघाला दमदार कमबॅक करून दिलं. कधी इकडे तर कधी तिकडे झुकत असलेल्या या सामन्याच्या शेवटी भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानच्या तोंडचा घास हिसकावून घेतला. दरम्यान या पराभवानंतर काय म्हणाला पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम? जाणून घ्या. (Babar azam Statement)

या सामन्यातील पराभवाचं कारण सांगताना बाबर आझम म्हणाला की, ' आम्ही गोलंदाजी तर चांगली केली. मात्र फलंदाजीत एकापाठोपाठ एक विकेट्स गमावल्या आणि निर्धाव चेंडूंची संख्याही अधिक होती. आमचा प्लान तयार होता. स्ट्राईक रोटेट करायची आणि बाऊंड्री मारायची. मात्र यादरम्यान खूप चेंडू निर्धाव राहिले. खालच्या फळीतील फलंदाजांकडून जास्तीची अपेक्षा करू शकत नाही. आम्ही सुरुवातीच्या ६ षटकात मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नात होतो.'

IND vs PAK: दारुण पराभवानंतर बाबर आझमला राग अनावर! या खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर
IND vs PAK : बुम- बुम बुमराहाच्या गोलंदाजीसमोर 'बाबर सेना' ढेर; पाकिस्तानचा ६ धावांनी पराभव

तसेच खेळपट्टीबाबत बोलताना तो म्हणाला की, ' खेळपट्टी उत्तम होती. चेंडू बॅटवर येत होता. कधी कधी अतिरिक्त उसळी घेत होता. इथून पुढे आम्हाला दोन्ही सामने जिंकणं महत्वाचं असणार आहे. आम्ही बसू आणि आमच्याकडुन काय चुका झाल्या आहेत, यावर नक्की विचार करू.'

IND vs PAK: दारुण पराभवानंतर बाबर आझमला राग अनावर! या खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर
IND vs Pak : फक्त एकच चेंडू ठरला टीम इंडियाच्या विजयाचा टर्निंग पॉइंट; पाकिस्तानला ती चूक पडली महागात

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाचा डाव १९९ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानला २० षटकअखेर ११३ धावा करता आल्या. यासह भारतीय संघाने हा सामना ६ धावांनी आपल्या नावावर केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com