IND vs Pak : फक्त एकच चेंडू ठरला टीम इंडियाच्या विजयाचा टर्निंग पॉइंट; पाकिस्तानला ती चूक पडली महागात

India vs Pakistan T20 Match : एकवेळ पाकिस्तान हा सामना सहज जिंकणार असं वाटत होतं. मात्र, टीम इंडियाच्या गोलंदाजांनी मोक्याच्या क्षणी विकेट्स मिळवत विजय खेचून आणला.
फक्त एकच चेंडू ठरला टीम इंडियाच्या विजयाचा टर्निंग पॉइंट; पाकिस्तानला ती चूक पडली महागात
India vs Pakistan Cricket MatchBCCI Twitter
Published On

आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने पुन्हा एकदा पाकिस्तानला चितपट केलं. अटीतटीच्या सामन्यात भारताने अगदी शेवटच्या क्षणी पाकिस्तानचा ६ धावांनी धुव्वा उडवला. नाणेफेक गमावल्यानंतर टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानसमोर १२० धावांचं आव्हान ठेवलं होतं. या आव्हाचा पाठलाग करताना त्यांची पुरती दमछाक झाली.

फक्त एकच चेंडू ठरला टीम इंडियाच्या विजयाचा टर्निंग पॉइंट; पाकिस्तानला ती चूक पडली महागात
IND vs PAK : बुम- बुम बुमराहाच्या गोलंदाजीसमोर 'बाबर सेना' ढेर; पाकिस्तानचा ६ धावांनी पराभव

बाबर आझम आणि मोहमद रिजवान वगळता पाकिस्तानच्या कोणत्याही फलंदाजांचा खेळपट्टीवर तग धरता आली नाही. परिणामी पाकिस्तानचा संघ केवळ ११३ धावाच करू शकला आणि भारताने हा सामना ६ धावांनी खिशात टाकला. एकवेळी पाकिस्तान हा सामना सहज जिंकणार असं वाटत होतं.

मात्र, टीम इंडियाच्या गोलंदाजांनी मोक्याच्या क्षणी विकेट्स मिळवत विजय खेचून आणला. जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंह भारताच्या विजयाचे हिरो ठरले. याशिवाय अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजाने सुद्धा चांगली गोलंदाजी करत पाकिस्तानी फलंदाजांचा रोखलं.

टीम इंडियाच्या विजयाच्या टर्निंग पॉइंट

रिषभ पंतने केलेल्या दमदार फलंदाजीच्या जोरदावर टीम इंडियाने पाकिस्तानसमोर १२० धावांचं आव्हान ठेवलं होतं. या आव्हाचा पाठलाग करताना पाकिस्तानने अतिशय सावध सुरुवात केली. कर्णधार बाबर आझम आणि मोहमद रिजवान या सलामी जोडीने पावर प्लेमध्ये ३५ धावा जोडल्या. मात्र, जसप्रीत बुमराहने ही जोडी फोडली.

त्यानंतर मोहमद रिजवानने उस्मान खान आणि फखर जमानसोबत छोटेखानी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. एकवेळ पाकिस्तानची अवस्था १० षटकात ३ बाद ७३ इतकी होती. अनुभवी मोहमद रिजवान मैदानावर तग धरून होता. हा सामना आपण सहज जिंकू असं पाकिस्तानी खेळाडूंना वाटत होतं.

पाकिस्तानला अतिआत्मविश्वास नडला

दरम्यान, पाकिस्तानच्या फलंदाजांनी हार्दिक पंड्याला मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, हीच चूक त्यांना महागात पडली. पंड्याने झटपट दोन विकेट्स काढल्या. त्यानंतर बुमराहने १५ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर सेट झालेल्या मोहमद रिजवानला बाद केलं. तिथेच हा सामना फिरला.

शेवटच्या ३ षटकात पाकिस्तानला ३० धावांची गरज होती. पण मोहमद सिराज, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंहने अचूक मारा केला. सरतेशेवटी पाकिस्तानला या सामन्यात ६ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. टी-२० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाचा हा सलग दुसरा विजय असून पाकिस्तानचा दुसरा पराभव आहे.

फक्त एकच चेंडू ठरला टीम इंडियाच्या विजयाचा टर्निंग पॉइंट; पाकिस्तानला ती चूक पडली महागात
AFG vs NZ: T20 वर्ल्डकपमध्ये आणखी एक उलटफेर! अफगाणिस्तानचा बलाढ्य न्यूझीलंडला 'दे धक्का'; ८४ धावांनी उडवला धुव्वा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com