AFG vs NZ: T20 वर्ल्डकपमध्ये आणखी एक उलटफेर! अफगाणिस्तानचा बलाढ्य न्यूझीलंडला 'दे धक्का'; ८४ धावांनी उडवला धुव्वा

T20 World Cup 2024 AFG vs NZ: अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी दिलेले निर्णायक धावांचे आव्हान अन् नंतर गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याने न्यूझीलंडचा धुव्वा उडाला. कर्णझार राशिद खान आणि फजलहक फारूकी या विजयाचे शिल्पकार ठरले.
 AFG vs NZ: T20 वर्ल्डकपमध्ये आणखी एक उलटफेर! अफगाणिस्तानचा बलाढ्य न्यूझीलंडला 
 'दे धक्का'; ८४ धावांनी उडवला धुव्वा
Published On

टी ट्वेंटी विश्वचषकाच्या मैदानात अफगाणिस्तानच्या संघाने बलाढ्य न्यूझीलंड संघाचा ८४ धावांनी पराभव करत नवा पराक्रम केला. आधी अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी दिलेले निर्णायक धावांचे आव्हान अन् नंतर गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याने न्यूझीलंडचा धुव्वा उडाला. कर्णझार राशिद खान आणि  फजलहक फारूकी या विजयाचे शिल्पकार ठरले.

सामन्याच्या सुरूवातीला न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या अफगाणिस्तानने 20 षटकांत 6 गडी गमावून 159 धावा केल्या. अफगाणिस्तानकडून फजलहक फारुकीने खेळी खेळली, त्याने 56 चेंडूत 5 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 80 धावा केल्या. याच धावांच्या जोरावर अफगाणिस्तानच्या संघाने न्यूझीलंडसमोर १६० धावांचे लक्ष ठेवले होते.

परंतु 160 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात खूपच खराब झाली. डावाच्या पहिल्याच चेंडूवर संघाला पहिला धक्का बसला, जेव्हा फझलहक फारुकीने फिन ऍलनला बोल्ड करून गोल्डन डकवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर किवी संघाने तिसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर डेव्हॉन कॉनवेच्या रूपाने दुसरी विकेट गमावली.

 AFG vs NZ: T20 वर्ल्डकपमध्ये आणखी एक उलटफेर! अफगाणिस्तानचा बलाढ्य न्यूझीलंडला 
 'दे धक्का'; ८४ धावांनी उडवला धुव्वा
T20 World Cup 2024: भारतीय वंशाच्या सौरभच्या सुपर ओव्हरने अमेरिकेला मिळवून दिला सुपर विजय

अशाप्रकारे फलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे न्यूझीलंडचा संघ 75 धावांवर ऑलआऊट झाला. अफगाणिस्तानच्या गोलंदाजीसमोर न्यूझीलंडच्या फलंदाजांची अवस्था इतकी वाईट झाली की त्यांना पूर्ण २० षटकेही खेळता आली नाहीत. अवघ्या 15.2 षटकांत न्यूझीलंडचा डाव संपुष्टात आला. या विजयासोबतच अफगाणिस्तानने न्यूझीलंडला टी ट्वेंटीमध्ये पहिल्यांदा धुळ चारण्याचा पराक्रम केला. तसेच टी-20 विश्वचषकाच्या इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा पराभव आहे.

 AFG vs NZ: T20 वर्ल्डकपमध्ये आणखी एक उलटफेर! अफगाणिस्तानचा बलाढ्य न्यूझीलंडला 
 'दे धक्का'; ८४ धावांनी उडवला धुव्वा
IND vs IRE: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा विजयाने 'श्रीगणेशा', आयर्लंडचा पराभव

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com