T20 World Cup 2024: भारतीय वंशाच्या सौरभच्या सुपर ओव्हरने अमेरिकेला मिळवून दिला सुपर विजय

USA vs Pakistan: टी-२० वर्ल्ड कपच्या गुरुवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध अमेरिकेच्या संघाचा रोमांचक सामना झाला. या सामन्यात सुपर ओव्हर दरम्यान एका भारतीय खेळाडूने पाकिस्तानच्या संघाचा पराभव केला.
T20 World Cup
USA vs PakistanCanva

टी-२० वर्ल्ड कपच्या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेची अनेक क्रिकेट चाहात्यांना उत्सुकता लागलेली होती. यात होणाऱ्या रोमांचकारी सामने पाहण्याची मज्जा काही औरच असते. असाच सामना गुरुवारी पाकिस्तान विरुद्ध अमेरिका या दोन्ही संघामध्ये झाला. हा सामना टॅक्सिसमधील ग्रँड प्रेरी स्टेडियमवर खेळण्यात आला. या सामन्यादरम्यान अमेरिकेच्या संघाने नवा इतिहास रचलाय. या सामन्यात सुपर ओव्हर दरम्यान अमेरिकेच्या संघाने पाकिस्तानचा पराभव केला. या सामन्यातील पराभवामुळे पाकिस्तानचा संघ अडचणीत आल्याचं दिसून आलं.

T20 World Cup
USA vs PAK Match : पाकिस्तानचा पहिल्याच सामन्यात पराभव; अमेरिकेने सुपर ओव्हरमध्ये सामना जिंकत रचला इतिहास

ग्रँड प्रेरी स्टेडियमवर झालेल्या सामन्यामध्ये अमेरिकेच्या संघाने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र पाकिस्तानच्या संघाला १५१ धावांवर रोखले. पाकिस्तानच्या संघाची फलंदाजी सुरुवातीपासूनच फारशी खास दिसली नाही. पाकिस्तानच्या संघाने अवघ्या २६ धावांमध्ये तीन विकेट्स गमवल्या होत्या. त्यानंतर मैदानावर बाबर आझमची एन्ट्री झाली. त्याने ४३ चेंडूंमध्ये ४४ धावांची खेळी खेळली, त्याला साथ देत शादाब खानने ४० धावांची खेळी केली. पण पाकिस्तानच्या संघाकडून संथ गतीची फलंदाजी झाल्याच पाहायला मिळाली. अमेरिकेच्या नॉस्टुश केंजिगे या खेळाडूने पाकिस्तानच्या संघाचे ३ गडी बाद केले.

अमेरिकेच्या संघाने हा सामना सौरभ नेत्रावळकर याच्या नेतृत्वाखाली जिंकला. सौरभ नेत्रावळकर युनायटेड स्टेट्सच्या संघाचे टी-२० वर्ल्ड कपच्या सामना खेळत आहे. गुरुवारी सामन्यात झालेल्या सुपर ओव्हरमध्ये त्याने त्याच्या गोलंदाजीमुळे चाहत्यांना आश्चर्यचकित केले.

कोण आहे सौरभ नेत्रावळकर ?

सौरभ नेत्रावळकर डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज आहे. सौरभचा जन्म १६ ऑक्टोबर १९९१ रोजी मुंबईत झाला होता. सौरभने मुंबईच्या संघाकडून प्रथम श्रेणीचे सामने खेळलेत. तो सूर्यकुमार यादवचा चांगला मित्र सुद्धा आहे. ३२ वर्षीय सौरभने आपल्या आंतराष्ट्रीय क्रिकेटच्या कारकिर्दीची सुरुवात २०१० मध्ये अंडर-१९ वर्ल्ड कप स्पर्धेत के. एल. राहुल, जयदेव उनाडकट आणि मयांक अग्रवाल या खेळाडूंसोबत भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

T20 World Cup
T-20 World Cup 2024: इंग्लंडला मोठा धक्का! तर नेदरलँडची विजयी सलामी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com