babar azam becomes the most successfull captain in t20i most wins record amd2000
babar azam becomes the most successfull captain in t20i most wins record amd2000twitter

Babar Azam Record: बाबर आझमने रचला इतिहास! मोठ्या रेकॉर्डमध्ये रोहित, धोनीलाही सोडलं मागे

Most Wins In T20 Internationals: पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने मोठा रेकॉर्ड करुन दाखवला आहे. मोठ्या रेकॉर्डमध्ये त्याने रोहित शर्मा आणि एमएस धोनीलाही मागे सोडलं आहे.

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये महारेकॉर्डला गवसणी घातली आहे. नुकताच नव्याने कर्णधारपद स्वीकारलेला बाबर आझम टी -२० क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधार बनला आहे. सध्या पाकिस्तान आणि आयर्लंड या दोन्ही संघांमध्ये टी -२० मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने शानदार विजय मिळवला आहे. या सामन्यात पराभवाची परतफेड करत ७ गडी राखून विजय मिळवला. हा विजय बाबर आझमसाठी ऐतिहासिक ठरला आहे. तो टी -२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारा कर्णधार ठरला आहे.

बाबर आझमने युगांडाचा कर्णधार ब्रायन मसाबाला मागे सोडत सर्वाधिक सामने जिंकण्याचा कारनामा केला आहे.बाबर आझमने ७८ टी -२० सामन्यांमध्ये पाकिस्तान संघाचं नेतृत्व केलं आहे. यादरम्यान त्याने ४५ सामन्यांमध्ये पाकिस्तानला विजय मिळवून दिला आहे. तर २६ सामन्यांमध्ये पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला आहे आणि ७ सामने अनिर्णीत राहिले आहेत. तर ब्रायन मसाबाच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने ५६ सामन्यांमध्ये नेतृत्व करताना ४४ सामन्यांमध्ये आपल्या संघाला विजय मिळवून दिला आहे. या रेकॉर्डमध्ये बाबर आझमने त्याला पछाडलं आहे.

babar azam becomes the most successfull captain in t20i most wins record amd2000
IPL Playoffs 2024: CSK नव्हे तर RCBच जाणार प्लेऑफमध्ये! ही आकडेवारी पाहून खात्री पटेल

टी -२० क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधार..(सर्वाधिक सामने जिंकणारे..)

बाबर आझम (पाकिस्तान) - ४५ सामने

ब्रायन मसाबा (युगांडा) - ४४ सामने

असगर अफगान (अफगाणिस्तान) - ४२ सामने

ओएन मॉर्गन (इंग्लंड) - ४२ सामने

रोहित शर्मा (भारत) - ४१ सामने

एमेएस धोनी (भारत) - ४१ सामने

आरोन फिंच (ऑस्ट्रेलिया) - ४० सामने

babar azam becomes the most successfull captain in t20i most wins record amd2000
Sunil Gavaskar Statement: 'IPL सोडून देशाकडून खेळणाऱ्यांवर कारवाई व्हायलाच हवी..' सुनील गावसकरांची BCCI कडे मागणी

या यादीत भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार एमएस धोनीचा देखील समावेश आहे. मात्र हे दोन्ही कर्णधार बाबर आझमपेक्षा खूप मागे आहेत. या दोघांनी आपल्या संघाला ४१-४१ सामने जिंकून दिले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com