आगामी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर इंग्लंडचा संघ पाकिस्तान संघाविरुद्ध टी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. ही मालिका खेळण्यासाठी आयपीएल खेळत असलेले इंग्लंडचे खेळाडू मायदेशी परतणार आहे. त्यामुळे इंग्लंडचे खेळाडू प्लेऑफच्या सामन्यांना हजर नसणार आहेत. दरम्यान आयपीएल सोडून मायदेशी परतणाऱ्या खेळाडूंवर भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी संताप व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यांनी या खेळाडूंवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सुनील गावसकर यांनी एका वृत्तपत्राच्या कॉलममध्ये लिहीले की, ' मी त्या खेळाडूंमधून एक आहे जो कुठल्याही गोष्टीच्या तुलनेत देशासाठी क्रिकेट खेळण्याला अधिक प्राधान्य देतो. मात्र संपूर्ण हंगामासाठी उपलब्ध राहण्याचं आश्वासन देऊन हे खेळाडू मायदेशी परतणार असतील, तर याने फ्रँचायझीचा आत्मविश्वास खालवतो. फ्रँचायझीने असं करणाऱ्या खेळाडूंवर कारवाई करायलाच हवी, यासह बोर्डला कमिशन देणं देखील थांबवलं पाहिजे. आयपीएल खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूच्या रकमेतील १० टक्के रक्कम ही बोर्डला कमिशन म्हणून दिली जाते.
तसेच त्यांनी पुढे लिहिले की,' जर बोर्डला आपला शब्द पाळता येत नसेल, तर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. १० टक्के कमिशन हे केवळ बीसीसीआय देतं. इतर कुठल्याही स्पर्धेत असं केलं जात नाही. मात्र बीसीसीआयचं कधी कौतुक केलं गेलं नाही.'
इंग्लंडचा संघ २२ मे पासून पाकिस्तानविरुद्ध टी-२० मालिका खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. आगामी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेच्या दृष्टीने ही मालिका दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाची असणार आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डने घेतलेल्या या निर्णयामुळे जोस बटलर, फिल सॉल्ट आणि मोईन अली यांना मायदेशी परतावं लागणार आहे. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स संघाला मोठा धक्का बसणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.