IPL 2024 RCB vs DC: दिल्लीचा पराभव का झाला? कारण सांगतांना संतापला कर्णधार अक्षर पटेल

RCB vs DC Axar Patel Match Loss Reasons : रविवारी चिन्नास्वामी स्टेडियमवर इंडियन प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्सचा सामना झाला. यात दिल्लीचा ४७ धावांनी दारुण पराभव झाला. दिल्ली कॅपिटल्सचा संघ का पराभूत झाला. संघाच्या कोणत्या गोष्टी कर्णधार पटेलला पटल्यानंतर नाहीत, याची माहिती अक्षरने सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
IPL 2024 RCB vs DC: दिल्लीचा पराभव का झाला? कारण सांगतांना संतापला कर्णधार अक्षर पटेल
Axar Patel Match Loss Reasons Google
Published On

बेंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियमवर दिल्लीच्या संघाचा दारुण पराभव झाला. दिल्लीच्या खेळाडूंनी केलेल्या खराब क्षेत्ररक्षणामुळे दिल्लीला पराभवाला सामोरे जावे लागले. क्षेत्ररक्षणावेळी कॅच सोडल्यामुळे विजयावरील आपली पकड सुटल्याचं कर्णधार अक्षर पटेल याने सांगितलं.

रविवारी चिन्नास्वामी स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूमध्ये झालेल्या सामन्यात आरसीबीने ४७ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने १८८ धावांचे आव्हान दिलं होतं. आरसीबीच्या संघाला १५० धावांमध्येच रोखलं हवं होतं असंही पटेल म्हणालाय. दरम्यान आरसीबीने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीला फक्त १४० धावा करता आल्या. दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने सर्व १० गडी गमावत फक्त १४० धावा केल्या.

झेल पकडता येईना

कॅचेस विन्स मॅचेस (Catches Wins Matches )असं म्हटलं जातं. दिल्लीच्या संघाला तीच प्रचिती आली. दिल्ली कॅपिटल्सच्या खेळांडूनी ज्या फलंदाजांचे कॅच सोडले त्यांनीच त्यांच्यासमोर मोठी धावसंख्या उभारण्यात मोठी भूमिका बजावली. आरसीबीचा फलंदाज रजत पाटीदारने दमदार फलंदाजी करत ३२ चेंडूत ५२ धावा केल्या. तर विस जॅक्सने २९ चेंडूमध्ये ४१ धावांची खेळी केली. दिल्लीच्या खेळाडूंनी या दोन्ही फलंदाजाचे कॅच सोडल्या होत्या.

पराभवानंतर दिल्लीच्या कर्णधाराचा राग अनावर

अक्षर पटेल सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत म्हणाला, 'कॅच सोडल्यामुळे आमचे नुकसान झाले. आरसीबीला १५० धावांपर्यंत रोखता आले असते. जेव्हा तुम्ही पॉवरप्लेमध्ये चार विकेट गमावता तेव्हा तुम्ही नेहमी सामन्यातील आव्हानाचा पाठलाग करत असतो. दरम्यान आरसीबीला १६०-१७० मध्ये रोखलं असतं तर हा स्कोअर स्पर्धात्मक ठरला असता.

खेळपट्टीवर नाराजी व्यक्त करताना पटेल म्हणाला, मधूनमधून काही चेंडू खेळपट्टीवरून थांबून येत होते. तर काही चेंडू पडताच ते वेगाने उसळत बॅटवर येत होते. तर काही चेंडू थांबून फलंदाजाच्या बॅटवर येत होते. जेव्हा पॉवरप्लेमध्ये तुमचे ४ मुख्य खेळाडू धावबाद होतात तेव्हा कठीण परिस्थिती निर्माण होत असते.

दिल्ली प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर

रजत पाटीदारच्या अर्धशतकानंतर, यश दयालच्या नेतृत्वाखालील गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. आरसीबीने या मोसमात सलग पाचवा विजय नोंदवलाय. आरसीबीने पाहुण्या संघाला प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर केलंय, असं म्हटलं जातंय.

IPL 2024 RCB vs DC: दिल्लीचा पराभव का झाला? कारण सांगतांना संतापला कर्णधार अक्षर पटेल
RCB vs DC: बेंगळुरूचा 'चॅम्पियन' गेम; पॉईंट्स टेबलमध्ये घेतली भरारी, दिल्लीचा संघ बाहेर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com