एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये झालेल्या सामन्यात बेंगळुरू संघाचा दमदार विजय झाला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने २० षटकांत ९ गडी गमावून १८७ धावा केल्या. बेंगळुरूने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीच्या संघाची दमछाक झाली. आरसीबीने दिल्लीचा ४७ धावांनी पराभव केलाय. आयपीएलच्या सुरुवातीला पाईंट्स टेबलच्या पायथ्याशी असलेला आरसीबीच्या संघाने 'चॅम्पियन' खेळ दाखवत पाईंट्स टेबलमध्ये भरारी घेत पाचव्यास्थानी पोहोचलाय. तर दिल्लीला प्लेऑफच्या स्पर्धेतून बाहेर काढलंय.
दरम्यान आरसीबीने दिलेलं आव्हान इतकं मोठं नव्हतं, यामुळे दिल्लीचा संघ हे आव्हान परत करत या स्पर्धेत आपला दम दाखवेल असं वाटत होतं. परंतु बेंगळुरूच्या गोलंदाजानी डावात पुनरागमन करत दिल्लीच्या संघाच्या अपेक्षा पावर प्लेमध्येच धुळीत मिळवल्या. पहिल्या षटकात स्वप्निल सिंहने डेविड वॉर्नरचा विकेट घेतली. तर तिसऱ्या षटकाच्या दोन चेंडूत अभिषेक पोरेल आणि जेक फ्रेजर मॅकगर्क आऊट झाले. येथून दिल्लीचा पराभव निश्चित दिसत होता.
होप आणि कर्णधार अक्षर पटेल यांनी उत्कृष्ट भागीदारी करत दिल्लीच्या संघाच्या पुनरागमनाच्या आशा उंचावल्या. परंतु लॉकी फर्ग्युसनने होपला बाद केल्यानंतर दिल्लीच्या संघाने बाळगलेली आशाही सोडून दिली. त्यानंतर लगेच कॅमेरून ग्रीनने ट्रिस्टन स्टब्सला धावबाद केलं. दरम्यान अक्षरने काही काळ एकाकी झुंज दिली पण तोही अर्धशतक झळकावल्यानंतर यश दयालचा बळी ठरला.
सुरुवातीला ८ सामन्यात ७ पराभव पचवणाऱ्या आरसीबीने दमदार कमबॅक करत पाईंट्स टेबलमध्ये मोठी उडी घेतलीय. बेंगळुरूने या मोसमात सलग ५सामने जिंकलेत. आयपीएल २०२४ च्या ६२ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला पराभव स्वीकारावा लागलाय. आरसीबीच्या या विजयाने बेंगळुरूच्या प्लेऑफमध्ये जाण्याच्या आशा पल्लवीत केल्या आहेत.
दरम्यान प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने निर्धारित २० षटकात ९ विकेट गमावत १८७ धावा केल्या. सर्वाधिक धावा रजत पाटीदारने केल्या. त्याने ३२ चेंडूत अर्धशतक झळकावले. यात ३ चौकार आणि ६ षटकार ठोकत त्याने वैयक्तिक ५२ धावा केल्या. त्यानंतर विल जॅक्सने २९ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकाराच्या मदतीने वैयक्तीक ४१ धावा केल्यात. त्यानंतर कॅमरन ग्रीनने २४ चेंडूत ३२ धावा करत नाबाद राहिलाय.
दरम्यान या सामन्यात विराट कोहली आणि फाप डु प्लेसी हे अपयशी ठरलेत. कोहलीला फक्त २७ धावा करता आल्या तर प्लेसीला फक्त ६ धावा करता आल्या. तर दिनेश कार्तिक आणि स्वप्निल सिंह यांना साधं खातं उघडता आलं नाही. दरम्यान दिल्लीच्या संघाकडून गोलंदाजी करताना खलील अहमद आणि रसिख सलामने दोन-दोन विकेट घेतल्या आहेत. तर इशांत शर्मा, मुकेश कुमार आणि कुलदीप यादवला एक-एक विकेट मिळाली.
सलग ५ वा विजय नोंदवून आरसीबीने दाखवून दिलं की पाईंट्स टेबल कसे फिरवायचं. एकीकडे या पराभवामुळे दिल्ली कॅपिटल्सचं आव्हान संपृष्टात येण्याची शक्यता आहे. तर दिल्लीने आज आरसीबीविरुद्धचा सामना जिंकला असता आणि पुढचा सामनाही जिंकला असता तर प्लेऑफसाठी सहज पात्र ठरू शकले असते. परंतु आरसीबीने दिल्लीची वाट अडवली असून त्यांच्यापुढील आव्हान वाढवलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.