Cricket News: क्रिकेटमधून टॉस होणार गायब; BCCI ने ठेवला नवा प्रस्ताव; का हटवली जाणार नाणेफेक? जाणून घ्या

Toss May End From This Domestic Tournament: बीसीसीआय लवकरच क्रिकेटच्या नियमांमध्ये मोठे बदल करणार आहे. बीसीसीआयने २३ वर्षांखालील स्पर्धेतील सीके नायडू ट्रॉफीमधून नाणेफेक काढून टाकण्याचा प्रस्ताव ठेवलाय. बीसीसीआयला हा निर्णय का घ्यावा लागला हे जाणून घेऊ.
Toss May End From Domestic Tournament:
Toss May End From Domestic Tournament:the week

क्रिकेट चाहत्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. क्रिकेटमध्ये नवीन आगळावेगळा नियम लागू केला जाणार असून क्रिकेटमधील सर्वात महत्त्वाची गोष्ट काढली जाणार आहे. क्रिकेट सामन्यांमध्ये नाणेफेक खूप महत्त्वाची गोष्ट असते. नाणेफेक जिंकणारा संघ बहुतेकवेळा सामना जिंकत असतो. मात्र आता तेच हद्दपार होणार आहे. हे वाचून जरा धक्का बसला असेल पण तुम्ही जे वाचलं ते बरोबर आहे.

बीबीसीआय क्रिकेटमधून टॉसला हद्दपार करणार आहे. अंडर २३ च्या म्हणजेच २३ वर्षाखालील टूर्नामेंट सीके नायडू ट्रॉफीमधून नाणेफेक रद्द केली जाऊ शकते. यासाठी बीसीसीआयने प्रस्ताव सादर करून सूचना मागवल्यात. या नव्या नियमानुसार पाहुण्या संघाला नाणेफेक न जिंकता फलंदाजी करायची की गोलंदाजी करायची याचा पर्याय असेल. याबाबतचा प्रस्ताव दुसरं कोणी नाही तर बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सादर केलाय. देशांतर्गत क्रिकेटचे नियम बदलण्यासाठी त्याने अनेक प्रस्ताव मांडलेत. त्या प्रस्तावांमध्ये त्यांनी नाणेफेक रद्द करण्याचा प्रस्तावही मांडलाय.

Cricbuzz च्या वृत्तानुसार, २३ वर्षांखालील टूर्नामेंट सीके नायडू ट्रॉफीमधून नाणेफेक लवकरच रद्द केली जाऊ शकते. यजमान संघाला फारसा फायदा मिळू नये म्हणून हे केले जात आहे. कसोटी क्रिकेट असो किंवा टी-२० क्रिकेट, त्यात नाणेफेक मोठी भूमिका बजावतं असते. कसोटी क्रिकेटमध्ये यजमान संघाला खेळपट्टीचा भरपूर फायदा होतो, कारण ते आपला कमकवूतपणा आणि ताकद लक्षात घेऊन खेळपट्टी तयार करत असतात. अशा स्थितीत यजमान संघाने नाणेफेक जिंकली तरी प्रतिस्पर्धी संघाला सामना जिंकणे कठीण होत असते. या परिस्थितीत निष्पक्ष सामना खेळता येणार नाही, असं अनेक खेळाडूंचे मत आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरनेही याबाबत प्रश्न उपस्थित केलेत.

याशिवाय पाहुण्या संघाला फलंदाजी किंवा गोलंदाजीची निवड असली पाहिजे, असंही मत अनेक खेळाडूंनी व्यक्त केलंय. त्यामुळे बीसीसीआयने नाणेफेक रद्द करण्याचा प्रस्ताव ठेवलाय. आता या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास २३ वर्षांखालील सीके नायडू ट्रॉफी स्पर्धेतून नाणेफेक लवकरच हद्दपार होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

Toss May End From Domestic Tournament:
Virat Kohli Record: IPL मध्ये इतिहास घडणार! विराट असा रेकॉर्ड करणारा ठरणार जगातील पहिलाच खेळाडू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com