बंगळुरूतील एम चिन्नास्वामीच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bengaluru) संघाने शानदार कामगिरी करत विजयाचा पंच दिला आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने ४७ धावांनी विजय मिळवला. या शानदार विजायसह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने प्लेऑफमध्ये जाण्याच्या आशा कायम ठेवल्या आहेत. तर दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्स संघाला मोठा धक्का बसला आहे. दोन्ही संघांचे प्रत्येकी १२-१२ गुण आहेत. प्लेऑफमध्ये जाण्यासाठी दोन्ही संघांना आता इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावं लागणार आहे. (IPL Points Table update)
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा हा पहिलाच संघ ठरला आहे. तर उर्वरित ३ स्थानांसाठी अजूनही खेळाडूंमध्ये चुरशीची लढत सुरू आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाने १२ सामन्यांमध्ये ९ सामने जिंकून १८ गुणांसह प्लेऑफचं तिकीट मिळवलं आहे. तर राजस्थान रॉयल्स संघाचे १२ सामन्यात १६ गुण आहेत. मात्र अजूनही हा संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकलेला नाही. राजस्थान रॉयल्सला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी केवळ १ सामना जिंकायचा आहे. तर उर्वरित २ स्थानांसाठी ४ संघांमध्ये लढत सुरू आहे.
चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांचे प्रत्येकी १४-१४ गुण आहेत. हैदराबादचे अजूनही २ सामने शिल्लक आहेत. तर चेन्नई सुपर किंग्ज संघाला १ सामना खेळायचा आहे. तर १२ गुणांसह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ पाचव्या स्थानी आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या पराभवानंतर दिल्लीचा संघ १२ गुणांसह सहाव्या स्थानी कायम आहे. त्यानंतर १२ सामन्यांमध्ये १२ गुणांसह लखनऊचा संघ सातव्या आणि गुजरात टायटन्सचा संघ आठव्या स्थानी आहे. शेवटी नवव्या स्थानी मुंबई इंडियन्स आणि पंजाबचा संघ सर्वात शेवटी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.