Team India Record: टीम इंडियाने रचला इतिहास! T-20 WC मध्ये असा रेकॉर्ड करणारा ठरला पहिलाच संघ

IND vs PAK, Team India Record News: पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय संघाने शेवटच्या षटकात विजय मिळवला आहे.
Team India Record: टीम इंडियाने रचला इतिहास! T-20 WC मध्ये असा रेकॉर्ड करणारा ठरला पहिलाच संघ
indian cricket team twitter
Published On

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने इतिहास रचला आहे. आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय संघाने कडवी झुंज देत विजयाची नोंद केली आहे. या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण ८ सामने खेळले गेले आहेत. यादरम्यान भारतीय संघाने ७ सामन्यांमध्ये बाजी मारली आहे.

तर पाकिस्तानला केवळ एका सामन्यात विजय मिळवता आला आहे. यासह भारतीय संघाच्या नावे टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत एकाच संघाविरुद्ध खेळताना सर्वाधिक विजय मिळवण्याची नोंद झाली आहे. या रेकॉर्डमध्ये भारतीय संघाने श्रीलंका, बांगलादेश आणि पाकिस्तानला मागे सोडलं आहे.

यापूर्वी श्रीलंका, पाकिस्तान आणि बांगलादेश या तिन्ही संघांनी वेस्टइंडिजला ६-६ वेळेस पराभूत केलं होतं. या रेकॉर्डसह भारतीय संघाच्या नावे आणखी एका मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. भारतीय संघाने या सामन्यात १२० धावांचा बचाव केला आहे. हा टी-२० वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात कमी धावसंख्येचा यशस्वी बचाव आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड श्रीलंकेच्या नावावर होता. श्रीलंकेने देखील १२० धावांचा यशस्वी बचाव केला होता.

Team India Record: टीम इंडियाने रचला इतिहास! T-20 WC मध्ये असा रेकॉर्ड करणारा ठरला पहिलाच संघ
IND vs PAK: दारुण पराभवानंतर बाबर आझमला राग अनावर! या खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर

पाकिस्तानविरुद्ध खेळताना दुसऱ्यांदा कुठल्या संघाने सर्वात कमी धावसंख्येचा यशस्वी बचाव केला आहे. यापूर्वी २०२१ मध्ये झालेल्या टी-२० सामन्यात झिम्बाब्वेने ११९ धावांचा यशस्वी बचाव केला होता . भारतीय संघाला हा विजय मिळवून देण्यात जसप्रीत बुमराहने मोलाची भूमिका बजावली आहे. त्याने संघाला चांगली सुरुवात करुन दिली आणि शेवटी जेव्हा संघाला गरज होती त्यावेळी त्याने विकेट्सही काढून दिल्या. या सामन्यात त्याने अवघ्या १४ धावा खर्च करत ३ गडी बाद केले. यासह त्याची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. यापूर्वी अमेरिकेविरुद्ध झालेल्या सामन्यातही त्याची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली होती.

Team India Record: टीम इंडियाने रचला इतिहास! T-20 WC मध्ये असा रेकॉर्ड करणारा ठरला पहिलाच संघ
IND vs PAK, T-20 World Cup: ६ चेंडू १८ धावा; अर्शदीपच्या शेवटच्या षटकात नेमकं काय घडलं?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com