IND Vs PAK: आता काय म्हणायचं! नाणेफेकदरम्यान रोहितला Coin सापडेना; हिटमॅनला पाहून बाबरलाही हसू अवरेना, पाहा व्हिडिओ

Rohit Sharma Babar Azam IND vs PAK Toss : रोहित शर्मा किती विसरभोळा असल्याची बाब परत एकदा कॅमेऱ्यासमोर आली. नाणेफेक करताना नाणे कुठे आहेच रोहितला आठवत नव्हतं. हिटमॅन रोहितला पाहून पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमलाही हसू आवरता येत नव्हतंय.
IND Vs PAK: आता काय म्हणायचं! नाणेफेकदरम्यान  रोहितला Coin सापडेना; हिटमॅनला पाहून बाबरलाही हसू अवरेना, पाहा व्हिडिओ
rohit sharma twitter
Published On

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा विसरभोळा स्वभावाचा असल्याचं सर्वांना माहितीये. विराट कोहलीने रोहितच्या या समस्येची माहिती एका मुलाखतीदरम्यान दिली होती. रोहित शर्मा दैनंदिन गरजाच्या वस्तूसुद्धा विसरत असतो, अशी कबुली विराटने दिली होती. रोहित बऱ्याचवेळा त्याचे पैशांचे पाकीट किंवा फोन हॉटेलमध्ये विसरलाय. रोहित विसरभोळा असल्याची बाब अनेकवेळा सामन्यादरम्यान समोर आलीय. असाच प्रकार न्यू यॉर्कमध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्यादरम्यान घडला.

सध्या टी२० विश्वचषकाचे सामने चालू आहेत. रविवारी भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेला सामना हा या स्पर्धेतील १९ वा सामना होता. भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या सामनाही नेहमी प्रमाणेच धकधक वाढवणारा झाला. पण या सामन्यादरम्यान रोहित शर्माचा विसरभोळापणा परत एकदा सर्वांना दिसला.

कुठे आहे नाणं, कॉईन काही सापडेना

न्यूयॉर्क स्टेडियममध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम हे नाणेफेकीसाठी मैदानात आले. रवी शास्त्रींनी नाणे नाणेफेक करण्यास सांगताच रोहित अंपायरकडून नाणे मागू लागला. नाणं आपल्याकडे नाहीये, असं अंपायरने सांगितल्यानंतर रोहित थोडा गोंधळला. नंतर त्याला आठवलं की, नाणेफेक करण्यासाठी दिलेलं नाणं त्यानेच त्याच्या खिशात ठेवलं होतं.

पण हे रोहितच्या लक्षात राहिलेच नाही. जेव्हा तो अंपायरकडे नाणे मागू लागला तेव्हा त्याला अचानकपणे ते आठवलं , की नाणं त्याच्याच पॅन्टच्या खिशात आहे. मग त्याने ते नाणे बाहेर काढले आणि हवेत फिरकाले. रोहितचा हा विसरभोळापणा पाहून बाबर आझमला हसू सुटले. त्याला हसू आवरता येत नव्हतं.

याआधीही असं घडलंय

२१ जानेवारी २०२३ रोजी न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यातही नाणेफेक दरम्यान रोहितची अशी फजिती झाली होती. नाणेफेक झाल्यानंतर फलंदाजी करायची की गोलंदाजी करायची हेच बोलायचं रोहित विसरला होता. दोन्ही कर्णधारांनी हवेत नाणे फेकलं त्यानंतर रोहितने सांगितलेली असलेली बाजू जमिनीवर पडलेल्या नाण्यावर दिसली. पण नाणेफेक जिंकल्यानंतर काय करायचं हेच रोहित विसरला होता. नाणेफेक झाल्यानंतर दोन -तीन मिनिटे असाच विचार करत राहिला. शेवटी त्याला बॉलिंग घ्यायची होती हे आठवलं होतं.

६ धावांनी पाकिस्तानचा पराभव

न्यू यॉर्कमध्ये झालेल्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानचा अवघ्या ६ धावांनी पराभव केला. जसप्रीत बुमराहाने कमालीची गोलंदाजी करत पाकिस्तानच्या फलंदाजांना स्वस्तात माघारी पाठवलं आणि सामना जिंकला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ फक्त ११९ धावाच करू शकला होता. भारताने दिलेलं आव्हान खूपच माफक आव्हान होतं. त्यामुळे टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागेल, असं वाटतं होतं. परंतु भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट असा खेळ करत पाकिस्तानच्या संघाला पराभूत केलं.

IND Vs PAK: आता काय म्हणायचं! नाणेफेकदरम्यान  रोहितला Coin सापडेना; हिटमॅनला पाहून बाबरलाही हसू अवरेना, पाहा व्हिडिओ
IND vs PAK : बुम- बुम बुमराहाच्या गोलंदाजीसमोर 'बाबर सेना' ढेर; पाकिस्तानचा ६ धावांनी पराभव

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com