IND vs PAK: 'त्याला बॅटींग तरी येते का?', पाकिस्तानच्या सुमार कामगिरीनंतर दिग्गज खेळाडू भडकले

Wasim Akram On India vs Pakistan Match: भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला आहे.
IND vs PAK:  'त्याला बॅटींग तरी येते का?', पाकिस्तानच्या सुमार कामगिरीनंतर दिग्गज खेळाडू भडकले
pakistan cricket teamtwitter

भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ जेव्हा जेव्हा आमनेसामने येतात,त्यावेळी भारतीय संघाचं पारडं जड असल्याचं पाहायला मिळालं आहे. भारतीय संघाने हे पुन्हा एकदा सिद्ध करुन दाखवलं आहे. ९ जून रोजी न्यूयॉर्कच्या नासाऊ काऊंटी क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते.

या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा ६ धावांनी धुव्वा उडवला आहे. हा सामना पाकिस्तानच्या हातात होता. मात्र भारतीय गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली आणि विजय खेचून आणला. दरम्यान या पराभवानंतर पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी संघातील खेळाडूंवर जोरदार टीका केली आहे.

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वसीम अक्रम म्हणाला की, ' रिझवान १० वर्षांपासून क्रिकेट खेळतोय. त्याला कोणी क्रिकेट शिकवू शकत नाही. त्याला लेग साईडला एकच शॉट खेळता येतो. कित्येक वर्षांपासून संघात आहे, मात्र त्याला फलंदाजी करता येत नाही.'

IND vs PAK:  'त्याला बॅटींग तरी येते का?', पाकिस्तानच्या सुमार कामगिरीनंतर दिग्गज खेळाडू भडकले
IND vs PAK: दारुण पराभवानंतर बाबर आझमला राग अनावर! या खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर

शोएब अख्तर काय म्हणाला?

पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत आपलं दु:ख व्यक्त केलं आहे. शोएब अख्तरच्या मते खेळाडूंनी स्वत:चा विचार न करता संघाचा विचार करुन खेळायला हवं. ' आमची खूप निराशाजनक कामगिरी केली आहे. आम्ही खरंच सुपर ८ मध्ये जाण्यासाठी दावेदार आहोत का? कोणीच सामना जिंकण्यासाठी खेळताना दिसून आलं नाही. मोहम्मद रिजवान हा सामना जिंकवू शकला असता. त्याने १-१ धाव घ्यायला हवी होती. मी कोणालाच दोषी ठरवणार नाही. मात्र रिझवान जर टिकला असता, तर आम्ही जिंकलो असतो.'

IND vs PAK:  'त्याला बॅटींग तरी येते का?', पाकिस्तानच्या सुमार कामगिरीनंतर दिग्गज खेळाडू भडकले
Rohit Sharma Statement: पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवूनही रोहित शर्मा नाराज! सामन्यानंतर म्हणाला...

भारतीय संघाचा विजय

या अटीतटीच्या लढतीत पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाचा डाव ११९ धावांवर आटोपला. पाकिस्तानला हा सामना जिंकण्यासाठी १२० धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानला ११३ धावा करता आल्या. यासह भारतीय संघाने हा सामना ६ धावांनी आपल्या नावावर केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com