USA vs IRE: चला घ्या बॅगा भरायला... फ्लोरिडाच्या पावसामुळे पाकिस्तानचं टी-20 WC मधून पॅकअप? कसं असेल समीकरण?

USA vs IRE, Weather Update: अमेरिका आणि आयर्लंड सामन्यावर पावसाचं सावट असणार आहे. दरम्यान हा सामना रद्द झाल्यास काय होणार?
USA vs IRE: चला घ्या बॅगा भरायला... फ्लोरिडाच्या पावसामुळे पाकिस्तानचं टी-20 WC मधून पॅकअप? कसं असेल समीकरण?
Pakistan cricket teamtwitter
Published On

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील ३० व्या सामन्यात अमेरिका आणि आयर्लंड हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. हा सामना फ्लोरिडातील सेंट्रल ब्रोवार्ड रिजनल पार्क स्टेडिमयमध्ये रंगणार आहे. या सामन्यावर पावसाचं सावट असणार आहे. हा सामना रद्द झाला, तर अमेरिकेचा मोठा फायदा होणार आहे. तर पाकिस्तानचं टेन्शन वाढणार आहे.

अमेरिका विरुद्ध आयर्लंड सामना रद्द झाला तर?

फ्लोरिडाच्या लॉडरहीलमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हा सामना स्थानिक वेळेनुसार सकाळी १० वाजता सुरु होणार आहे. तर १२ वाजेपासून अलर्ट असणार आहे. त्यामुळे हा सामना पावसामुळे रद्द होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. जर हा सामना पावसामुळे रद्द केला गेला तर दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण दिला जाईल. या १ गुणासह अमेरिकेचा संघ सुपर ८ साठी पात्र ठरेल. तर कॅनडा, आयर्लंड आणि पाकिस्तानचा प्रवास इथेच थांबेल.

पाकिस्तानला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं. मात्र सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात पाकिस्तानने कॅनडाला पराभूत करत दमदार कमबॅक केलं. पाकिस्तानला सुपर ८ मध्ये जाण्याची संधी होती. मात्र पावसामुळे पाकिस्तानला गेम ओव्हर होऊ शकतो.

पाकिस्तानला अजूनही सुपर ८ मध्ये जाण्याची संधी...

पाकिस्तानला अजूनही सुपर ८ मध्ये जाण्याची संधी असणार आहे. मात्र त्यासाठी पाकिस्तानला आधी पाऊस थांबण्याची प्रार्थना करावी लागेल. लॉडरहीलमध्ये भयंकर पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. पाकिस्तानचा शेवटचा सामना १६ जून रोजी आयर्लंडविरुद्ध होणार आहे. जर आज होणारा सामना रद्द झाला नाही तर पाकिस्तानला आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com