IND vs SA मालिकेसाठी टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेत दाखल! टी-२० मालिकेला केव्हा होणार सुरुवात?

India vs South Africa T20I Series Schedule And Timings: भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये ४ टी-२० सामन्यांची मालिका रंगणार आहे.
IND vs SA मालिकेसाठी टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेत दाखल! टी-२० मालिकेला केव्हा होणार सुरुवात?
team indiasaam tv
Published On

भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाला ३-० ने पराभवाचा सामना करावा लागला आहे. ही मालिका झाल्यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ४ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे.

या मालिकेसाठी भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत दाखल झाला आहे. बीलीसीआयने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. या व्हिडिओमध्ये भारतीय खेळाडू एकमेकांना प्रश्न विचारताना दिसून येत आहेत.

बीसीसीआयने हा व्हिडिओ शेअर करत हटके कॅप्शनही दिलं आहे. त्यांनी कॅप्शन म्हणून लिहिले की, ' भारतीय खेळाडू डरबनमध्ये पोहोचले आहेत. भारतीय खेळाडूंना आपल्या नव्या डेस्टीनेशबद्दल कितपट माहिती आहे?..' बीसीसीआयने काही दिवसांपूर्वीच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली होती. या दौऱ्यावरही सूर्यकुमार यादव भारतीय संघाचा कर्णधार असणार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना युवा खेळाडूंना संघात स्थान देण्यात आलं आहे.

IND vs SA मालिकेसाठी टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेत दाखल! टी-२० मालिकेला केव्हा होणार सुरुवात?
IND vs NZ Test: 'आज तुम्हाला द्रविडची आठवण..' भारताच्या पराभवानंतर पाकिस्तानी खेळाडू भडकला

असं आहे या मालिकेचं वेळापत्रक

८ नोव्हेंबर, पहिला टी-२० सामना, डरबन, रात्री ८ वाजता

१० नोव्हेंबर, दुसरा टी-२० सामना, गेकेबरहा, रात्री ८ वाजता

१३ नोव्हेंबर, तिसरा टी-२० सामना, सेंच्युरीयन, रात्री ८ वाजता

१५ नोव्हेंबर, पहिला टी-२० सामना,जोहान्सबर्ग, रात्री ८ वाजता

IND vs SA मालिकेसाठी टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेत दाखल! टी-२० मालिकेला केव्हा होणार सुरुवात?
Team India News: टीम इंडियाला मोठा धक्का! IND vs NZ मालिका संपताच स्टार खेळाडूची निवृत्तीची घोषणा

या मालिकेसाठी असे आहेत दोन्ही संघ:

भारतीय संघाविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी असा आहे दक्षिण आफ्रिकेचा संघ :

एडेन मार्करम, ओटनील बार्टमन, गेराल्ड कोएत्जी, डोनोवन फरेरा, रिजा हेंड्रिक्स, मार्को जानसेन, हेनरिक क्लासेन, पेट्रिक क्रूगर, केशव महाराज,नकाबा पीटर, रयान रिकेलटन, एंडिल सिमलेन, लूथो सिपाम्ला, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, मिहलाली मपोंगवाना

असा आहे भारतीय संघ:

सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रमनदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजयकुमार विशक, आवेश खान ,यश दयाल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com